💥पत्रकाराला हात-पाय तोडण्याची धमकी ; बायोडिझेल माफिया विरुद्ध आखेर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल...!


💥पत्रकार संरक्षण कायद्यानुसार बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे💥

बुलडाणा (11 जानेवारी) - मागील 6 जानेवारीला पत्रकार दिनीच एका इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या पत्रकाराला मलकापुर येथील अवैध बायोडिझल माफिया ॲड.इफ्तेखार शेख यांच्याकडून पाय तोडण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी अखेर आज 10 जानेवारी रोजी पत्रकारच्या तक्रारीवर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी बायोडिझेल माफिया विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      मलकापुर एमआईडीसी भागात सुरु असलेल्या अवैध व बनावट बायोडिझेल प्लांटवर मलकापुर एसडीपीओ त्यागी यांच्या पथकाने धाड टाकून 60 हजार लीटर बनावट बायोडिझेल साठा जप्त केला होता.या प्रकरणी संबंधितावर पुढे काय कार्रवाई करण्यात आली? अशी माहिती बुलडाणा येथील ई टीव्ही भारतचे जिल्हा प्रतिनिधि व टीव्ही जर्नलिस्ट एसोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पत्रकार वसीम शेख यांनी मलकापुर तहसीलदार यांच्याकडून बातमीच्या फॉलोअप साठी फोनवर घेतली होती.याच कारणावारुन आता आपला पीतळ उघडा पडेल म्हणून बायोडिझेल माफिया एड.इफ्तेखार शेख याने फोन करुण पत्रकार शेख यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुण पाय तोडण्याची धमकी दिली होती. पत्रकार शेख यांनी त्या दिवशी बुलढाणा शहर ठाण्यात तक्रार दिली असता काय दाखल पात्र स्वरूपाची नोंद करण्यात आली होती ही माहिती बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांना समजतात सर्व पत्रकारांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली होती दरम्यान आज सोमवारी बायोडीजल माफिया ॲड इफ्तेखार शेख याच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या