💥पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीचे सरपंच शिवाजी पाटील साखरे यांचा स्तुत्य उपक्रम...!


💥भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे स्वखर्चाने करत आहेत सुशोभीकरण💥

पुर्णा (दि.२० जानेवारी) - तालुक्यातील धनगर टाकळी येथील सरपंच शिवाजीराव साखरे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचा स्वखर्चातून सुशोभीकरणाचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

 भदन्त डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी धनगर टाकळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाची  पाहणी केली व समाधान व्यक्त केले या वेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका व गावकरी उपस्थित होते भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील शोषित पीडित वंचित दलित-बहुजन व स्त्रियांना भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून सन्मानाने जगण्याची संधी दिली.

सरपंच शिवाजीराव साखरे यांचं गावाच्या सर्वांगीण विकासासाठी करत असलेलं कार्य स्तुत्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा सुशोभीकरण पुतळ्याला हार अर्पण करण्यासाठी कायमस्वरूपी स्टील च्या पायऱ्या. उच्च दर्जाचे मार्बल्स गट्टू बसवण्याचं काम चांगल्या प्रकारे सुरू आहे डॉक्टर महाथेरो यांचा सत्कार सरपंच व बौद्ध उपासक उपासिका व गावकर यांच्या वतीने करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अध्यक्ष श्रीकांत हिवाळे माजी मुख्याध्यापक वामनराव पाटील आदी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या