💥राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेनेचे हिंदुत्व संपवते काय ?


💥ओबीसी वर माझा विश्वास नाही....ओबीसी ही ब्राह्मणवाद्यांना मानते - जितेंद्र आव्हाड 


लेखक ; सतिष सातोनकर परभणी

पुणे : जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार आढळराव पाटील यांनी ज्या पद्धतीने आम्हाला शिवसैनिक म्हणून सुखाने जगू द्या हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे केलेली उघड मागणी बरेच काही सांगून जाते राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर दोन पावले पुढे जात ओबीसी वर माझा विश्वास नाही.... ओबीसी ही ब्राह्मणवाद्यांना मानते परंतु ओबीसी हे विसरतात की त्यांच्या तीन पिढ्या पूर्वी ब्राह्मणांनी त्यांना मंदिरात यायला बंदी घातली होती.

मित्रांनो आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मंत्रिमंडळात सामील होणारे त्यांचे सहकारी म्हणजेच कॅबिनेट हे अत्यंत जबाबदारीचे पद आहेत परंतु गोपनीयतेची शपथ घेतलेल्या माणसांना कुठल्याही जातीवर अशा प्रकारचे प्रहार करण्याचे अधिकार घटनेने दिले आहेत का ? खरे तर राष्ट्रवादी आपण बहुमतात निवडून आल्यासारखे वागून शिवसेनेचे कंबरडे मोडत आहे कारण हिंदुत्वावर असे प्रहार केल्यानंतर शिवसेनेचा कडवट मतदारा नेमका स्वतःच्या डोक्यात धोंडा घालून घेतल्यासारखे राष्ट्रवादीच्या मंत्रीमहोदयांच्या वक्तव्यावरुन वाटत आ ?

सत्तेच्या माध्यमातून इतरांना धमकावणे आपल्या  आपल्या इच्छेप्रमाणे जरबात ठेवणे....ओबीसी चा एक मोठा घटक हिंदू धर्मावरील व रूढी परंपरा श्रद्धेवर विश्वास  ठेवतो म्हणून तर त्यांचे राजकीय आरक्षण जाण्यासाठी  शासकीय दिरंगाई कदाचित ओबीसी हिंदूधर्म मानतो म्हणून चिडून त्यांना ही शिक्षा तर देण्यात  आली नाही ना ? हैदराबाद मुक्तिसंग्राम मराठवाडा मुक्तिसंग्राम समजून घेण्यासाठी इतिहासाचे काही दस्तावेज वाचत बसलो असता विरंगुळा म्हणून सोशल मीडिया तपासत असताना आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब यांचे ओबीसी बद्दलचे ब्राह्मण्यवादी ओबीसी वर माझा विश्वास नाही हे वाक्य ऐकले  म्हणून माझ्यासमोर हा प्रश्न आहे.

ब्राह्मण अथवा कोणत्याही जातीबद्दल इतका द्वेष असणारी व्यक्ती घटनादत्त पदावर बसून न्याय-निवाडा करू शकत असेल का नैसर्गिक न्याय डिलिव्हर होत असेल का ? सतत हिंदुत्ववाद मांडणाऱ्या अथवा हिंदू सनातन धर्म मानणाऱ्या छोट्या-मोठ्या सर्वच समाजांना हिणवत राहणे त्यांचा अपमान करणे त्यांच्या श्रद्धेला त्यांच्या धर्मा निष्ठेला आस्तेला सतत आव्हान देणे कुठपर्यंत योग्य आहे ? ते ही मंत्री परिषदेचा जबाबदार सदस्य म्हणून असे वागणे शिवसेनेला परवडणारे आहे काय शिवसेनेचा पायाच मुळात हिंदुत्व या शब्दावर उभारलेला आहे ? कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये हिंदुत्वाचा अपमान करत राहणे  हे ठरले आहे काय ?

आदरणीय मंत्रीमहोदय तुमचा  रोष, राग ,ओबीसी  समाज ब्राह्मण्यवादी आहे म्हणून आहे का ? ओबीसी समाजाने आपला धर्म आपली श्रद्धा आपले देव यांचा त्याग करावा असा आपला मंत्री परिषदेत बसून आदेश वजा आग्रह आहे का ? कारण अगदी सरळ आहे आपल्या बोलण्याच्या मागचा उद्देश तमाम मंत्रीपरिषदेची इच्छा असा गृहीत धरल्या जातो कारण आपण कॅबिनेट मंत्री महोदय आहात...आपल्या असे बोलण्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शिवसेना नावाच्या राजकीय पक्षाला आपला जीव की प्राण समजणार्‍या ओबीसींनी काय मेसेज घ्यावा ?

महाराष्ट्रातील पारंपारिक शिवसेनेच्या निवडून येणाऱ्या लोकसभेच्या जागा या राष्ट्रवादीच्या विरोधात निवडून आलेले आहेत हे ओबीसी विसरत नाही ? म्हणून राजकीय  व सामाजिक विश्लेषक मराठवाड्यातील शिवसेनेचा एक संस्थापक साधा शिवसैनिक म्हणून माझ्या समोर उभारलेला फार मोठा प्रश्न आहे ? राष्ट्रवादीच्या जबाबदार नेत्यांचे वागणे शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या मुळावर आले आहे का  हिंदुत्व म्हणजे शिवसेनेचा प्राण  तो प्राण घेण्याचा आज कुणी प्रयत्न करत आहे का ? भारतीय राज्यघटनेने जसे तुम्हाला तुमचे जीवन जगण्याचे स्वतंत्र धार्मिक अधिकार दिलेले आहेत...तसे या देशातल्या सर्वच जाती धर्मातील या लोकांनाही दिलेले आहेत हेही आपल्याला मान्य नाही काय ?

खरे तर महाराष्ट्र मध्ये भाजप शिवसेनेची सगळ्यात मोठी चूक ही आहे की या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी पक्षाचा असा समज होऊ दिला की तुमच्याशिवाय आम्ही सत्तेत येऊ शकत नाही ? 2014ला स्थिर सरकार साठी आम्ही बाहेरून पाठिंबा देतो  असे माजी केंद्रीय मंत्री श्री प्रफुल्ल पटेल साहेबांनी निकाल लागण्याच्या अगोदरच दुपारी तीन वाजता घोषणा केल्याचे आम्ही विसरलो नाही...खरे तर शिवसेना इथेच कोंडीत पकडली गेली होती ? भाजपला पक्के माहीत होते की राष्ट्रवादी आपल्याबरोबर असल्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग कॅपॅसिटी संपणार आहे.याच गोष्टीचा फायदा घेत भारतीय जनता पार्टीने 2014 च्या उशीरा तयार झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांना टाकाऊ मंत्रीपदही दिली हे सत्य सर्व हिंदुत्ववाद्यांना मान्य असावे.

तीच चूक अथवा राजकीय धोरणीपणा असा  मानभावीपणा भाजपने 2019 च्या विधानसभा सत्ता स्थापनेमध्ये केला शिवसेनेला चर्चेसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत असे म्हणत प्रचंड वेळ घालवला...रात्री साडेबारा वाजता जी स्टुडिओतून चर्चा संपून मी हॉटेलच्या दिशेने निघालो सकाळी सकाळी माझ्या गावाकडच्या मित्राचा मला फोन आला अरे उठ रात्री टीव्हीवर काय बोलत होतास काय विश्लेषण करत होतास तू बघ आमच्या भाजपचं आणि राष्ट्रवादीचा सरकार आलं तो माझा शाळकरी मित्र मला फोन वर हिणवत होता माझी मजा किंवा थट्टामस्करी करतोय म्हणून मी फोन ठेवला त्याने पुन्हा फोन केला अरे  बघ टीव्ही लाव मी तसंच अगदी रागारागात टीव्ही लावला आणि पाहतो तर काय पहाटेचा शपथविधी मला अगदी पाच मिनिटं काहीच कळले नाही नंतर लक्षात आले 2014 चा एपिसोड पुढे चालू झाला आहे.

गणित अगदी सोपे होते महाराष्ट्रात भाजपला सत्तेत यायचे तरी राष्ट्रवादी बरोबर जावे लागेल आणि शिवसेनेला सत्तेत यायचे तरी  राष्ट्रवादी बरोबरच जावे लागेल मुळातच 2019 ला मिळालेले बहुमत हे हिंदुत्वाला मिळालेले बहुमत होते हे कटू  सत्य  जग जाहीर आहे ? शिवसेना-भाजपच्या मतभेदाचा पुरेपूर फायदा किंवा दोघांमध्ये मतभेद होतील अशी राजकीय खेळी करण्यामध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व यशस्वी झाले ? त्याची किंमत मोजतोय तो हिंदुत्ववादी म्हणून मतदान करणारा ओबीसी समाज? माझं खोटं असेल तर आदरणीय मंत्री महोदय श्री जितेंद्र आव्हाड साहेबांचे वाक्य अगदी स्पष्ट आहे... साहेब म्हणतात माझा ओबीसी समाजावर अजिबात विश्वास नाही कारण ते ब्राह्मण वादाच्या मागे लागतात याचाच अर्थ ते हिंदुत्ववादी पक्षांना मतदान करतात असा होत नाही का बरं ?आणि हाच घाव शिवसेनेच्या शाखा नावाचा संघटनात्मक कष्टातून उभा राहिलेल्या  मजबूत मनोऱ्याचा पाया खोदल्या सारखे नाही काय...अगदी साध्या भाषेत हा शिवसेनेच्या मुळाशी घाव घातले जात आहेत असे नव्हे का ?

म्हणून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार आढळराव पाटला सारख्या व्यक्तींना शिवसैनिकांना आरामशीर जगू द्या ? तर जबाबदार राष्ट्रवादी मंत्रीमहोदयांनी दिलेला ओबीसीला सज्जड दम माझ्या  राजकीय विश्लेषणाला बळ देऊन गेले.... म्हणूनच मी सारखा म्हणतो भविष्यातील निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय यांच्यामध्येच रंगणार असून या दोन पक्षांपैकी जो ओबीसीला आपल्या बाजूला ओढण्यात जो यशस्वी होईल ओबीसीचा विश्वास हस्तगत करण्यामध्ये यशस्वी होईल तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेला राजकीय पक्ष असेल. यात तिळमात्र शंका नाही.

प्रत्येक दिवशी शिवसेना, शिवसैनिक आणि शिवप्रेमीं मतदारांना "राष्ट्रवादीडागण्या "रोज मिळत असल्यामुळे  त्यातच सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादी पक्षाकडे असल्यामुळे ,हम करे सो कायदा ,हे शिवसैनिकांना ग्रामीण भागांमध्ये रोज अनुभवयास मिळत आहे........ क्रमशः भाग पहिला..... लेखक तथा राजकीय सामाजिक विश्लेषक: सतीश सातोनकर. नानलपेठ. परभणी. मराठवाडा. महाराष्ट्र....

 जय मराठवाडा  जय मराठवाडा मुक्ती संग्राम. जय हैदराबाद मुक्तिसंग्राम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या