💥परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जेष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर पुन्हा कोरोना बाधित....!


💥आ.वरपुडकर यांनी या बाबत स्वतः प्रसार माध्यमाला माहिती दिली💥

परभणी (दि.२८ जानेवारी) : परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री जेष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर हे पुन्हा कोविड पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आमदार वरपुडकर हे कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे ते काही काळ क्वारंटाईन होते तिसर्‍याही लाटेत सर्दी, ताप, खोकला सुरु झाल्यानंतर शंकेपोटी केलेल्या चाचणीतून वरपुडकर कोविड पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. वरपुडकर यांनी या बाबत स्वतः प्रसार माध्यमाला माहिती दिली. त्याद्वारे आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तातडीने चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले. कोरोनाबाधित प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नागरीकांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या