💥'इंडीयन ऑयल ग्राहक दिन' उद्या ९ जानेवारी रोजी ; मंगरूळपीर येथे एक दिवस पुर्वी आज ८ जानेवारी रोजी साजरा....!


💥यावेळी मा.आमदार किरणराव सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती💥 

वाशिम:- चितलांगे इन्डेन मंगरूळपीरच्या वतीने उद्या दि.०९ जानेवारी रोजी असलेला 'इंडीयन ऑयन ग्राहक दिन' एक दिवस पुर्वी आज ०८ जानेवारी २०२२ रोजी विविध कार्यक्रमाने साजरा करण्यांत आला. इण्डेन ग्राहकाच्या घरी जावून महिलांना सुरक्षा विषयक माहिती देवून बुके देवून भेट वस्तु देवून त्यांचा सन्मान करण्यांत आला. तसेच डीलीव्हरी मॅन व विविध ५० ग्राहकांना पिपिई किट,मास्क, सॅनिटायझर्सचे वितरण करण्यात आले. यावेळी मा.आमदार किरणराव सरनाईक,पुरुषोत्तम चितलांगे यांच्या हस्ते नगर परिषदचे आरोग्य अधिकरी राजेश संगत यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांना कोविड साहित्य देवून उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. अनेक ग्राहकांना धन्यवाद चे पत्र देवून त्यांचे आशिर्वाद घेतले. या उपक्रमात चितलांगे इण्डेनचे सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.यावेळी जमीरभाई,नितिन बोरकर,चंद्रकांत कांबळे,निलेश राठोड,रोशन राठोड,शुभम ढोबळे,यांच्यासह कर्मचारी ऊपस्थीत होते.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या