💥गंगाखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या तालुका कार्यालयात दर्पण दिन साजरा...!


💥यावेळी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती💥

 
गंगाखेड (दि.०६ जानेवारी) -
शहरातील गंगाखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यालयात आज गुरुवार दि.०६ जानेवारी २०२२ रोजी 'दर्पण दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते 'दर्पण' वर्तमानपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर, गंगाखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार रमेश कातकडे ,पत्रकार मिलिंद रायभोळे, ह भ प ज्ञानोबा ढेंबरे महाराज ,माधवराव भोसले आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या