💥स्वच्छ भारत मिशनच्या वतीने तुझं गावच नाही का तीर्थ ? मोहिमेचा शुभारंभ....!


💥जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम ; जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत तुझं गावच नाही का तीर्थ ? या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी पोस्टरचे अनावरण करुन केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, जिल्हा परिषद सदस्य कल्पना राऊत, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार मोरे यांची यावेळी उपस्थिती होती.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकारातुन स्वच्छतेबाबत गावात मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणुन आता तुझं गावच नाही का तीर्थ? ही टॅग लाईन घेऊन मोहिम जिल्ह्यातील गावांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये सध्या स्वच्छता रथाच्या माध्यमातुन गावागावात स्वच्छता, ओडिएफ प्लस, सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, कोरोना व स्वच्छता ईत्यादी विषयावर जनजागृती करण्यात येत आहे. पुढच्या टप्प्यात कलापथकाचे कार्यक्रम व गुड मॉर्निंग मोहिमेला गती देण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले यांनी दिली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या