💥बिलोली येथील ईनामी सातबारावरील खाजगी नावे निघणार ?


💥वादग्रस्त मुतवल्ली हाजिर हो.....💥

बिलोली (दि.३० जानेवारी) ;- येथील दर्गा शहिद हजरत नवाब सरफराज खान व मशिदीच्या ईनामी सातबारावर खाजगी नावे आल्यामुळे येत्या मंगळवारी १ फेब्रुवारी ला उपविभागिय अधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली असून वादग्रस्त व प्रभारी मुतवल्ली सह सातबारावर नावे असलेल्या खाजगी व्यक्तिंना सुनावणीस हाजिर होण्याची नोटीस काढले असल्याची माहिती उपविभागिय कार्यालयाकडून  प्राप्त झाली आहे.


◼️शहरातील ऐतिहासिक दर्गा शहिद हजरत नवाब सरफराज खान व मशिदीच्या नावे हैद्राबाद रोडच्या दुतर्फा महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालकिची ईनामी जागा आहे.सर्व्हे क्रंमांक ५७७,५८० या सातबारावर दर्गा व मशिदीचे वादग्रस्त व प्रभारी मुतवल्लीनी आपल्यासह आपल्या नातेवाईकांची,खाजगी व्यक्तिंची नावे बेकायदेशीर व अनाधिकृतपणे तत्कालीन तलाटी व मंडळअधिकारी यांना हाताशी धरुन नावे लावून घेतली.सदरिल प्रकरणात शासन निर्णय क्रंमांक २०१५/ज-१अ/दि.१३ एप्रिल २०१६ नुसार वक्फ मंडळाच्या मालकिच्या ईनामी जागेच्या सातबारावर सर्व नावे काढण्यासाठी शहरातील मुस्लिम बांधव,सामाजिक कार्यकर्ते यांनी रितसर तक्रार दिली होती.तक्रारीच्या अनुषंगाने दि.८ व दि.२२ डिसेंबर२०२१ अश्या दोन वेळा तहसिलदार यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली.पण तहसिलदार यांना सातबारावरील नावे काढण्याचा अधिकार नसल्याने ह्या प्रकरणाची संचिका सध्या उपविभागिय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली.या प्रकरणाची सुनावणी येत्या १ फेब्रुवारी ला घेण्यात येणार आहे.या सुनावणीत ईनामी जागेच्या सातबारावरील लावण्यात आलेले सर्व खाजगी नावे निघतिल का? तसेच दर्गा व मशिदीचे तात्पुरते मुतवल्ली यांनी महामार्गावरील ईनामी जागा अनाधिकृतपणे विनापरवानगी  भाड्याने,गहाण,करारपध्दतीने दिले आहे.तसा स्पष्ट अहवाल वक्फ अधिका-यांनी दिला आहे.वक्फ बोर्ड मंडळ व उपविभागिय कार्यालय बिलोली हे या तात्पुरते मुतवल्लीवर काय कारवाई करतील याकडे येथिल मुस्लिम बांधवांच लक्ष आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या