💥नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागातील सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी उमाकांत निळकंठराल उदगीरकर यांचे निधन...!


💥त्यांच्या पश्चात पत्नी तिन मुल एक मुलगी असा परिवार आहे💥

नांदेड (दि.१३ जानेवारी) - येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तब्बल अडोतीस वर्षे पदिर्घ सेवा बजावून निवृत्त झालेले सेवानिवृत्त विस्तार अधिकारी तथा मालेगाव रोडवरील सरपंच नगर परिसरातील रहिवासी उमाकांत निळकंठराव उदगीरकर यांचे काल बुधवार दि.१२ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०३-३० वाजेच्या सुमारास दिर्घ आजाराने वयाच्या ७८ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी तिन मुल नितीन उमाकांत उदगीरकर,सचिन उमाकांत उदगीरकर,सुमित उमाकांत उदगीरकर व एक मुलगी कविता शिंदे असा परिवार आहे त्यांच्या पार्थिव देहावर आज गुरुवार दि.१३ जानेवारी २०२२ रोजी गोदावरी नदीच्या काठावरील 'गोवर्धन घाट' येथे सकाळी ११-३० वाजेच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात आले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या