💥लोकशाही मराठी पत्रकार संघाने पत्रकारिता क्षेत्रात महिलांचा वाढवलेला सहभाग कौतुकास्पद - राजेंद्र काळे


💥पत्रकारांनी संघटीत राहुन निर्भिड लिखाण करावे - मनोहर  गायकवाड 

✍️ मोहन चौकेकर 

💥लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारदिन साजरा💥

चिखली:- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमीत्त देशभर पत्रकार दिन साजरा करण्यात येतो त्याचाच एक भाग म्हणुन लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार मार्गदर्शन व सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार मनोहर गायकवाड तर प्रमुख मार्गदर्शक मराठी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे, दैनिक विदर्भ दर्पण चे संपादक अनिल पळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुमित सरदार तर विषेश उपस्थीतीत चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ईफ्तेखार खान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे, पत्रकार संजय जाधव, पत्रकार अरुण  जैन ,संजय निकाळजे,  नितीन फुलझाडे, पत्रकार ईम्राण शहा, मोहन चौकेकर, राजेश बिडवे हे होते.निमित्ताने व्यवसाय  क्षेत्रातील, राजीकय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले.यावेळी पुष्प हार शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यामधे

सत्कार मूर्ती नवनियुक्त जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांतजी बर्दै, उद्योजकता पुरस्कार प्राप्त राजर्षी शाहु पतसंस्थेचे अध्यक्ष संदिप शेळके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष समाधान सुपेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य रवींद्र तोडकर, विद्युत महावितरण योजनेचे सदस्य शेखर बोंद्रे, समाज कल्याण समितीचे सदस्य राजेश गवई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधानसभा उपाध्यक्ष तथा दैनिक किसान सभेचे संपादक संजय खेडेकर बोंड आळी नियंत्रण समितीचे सदस्य नंदकिशोर वराडे यांचा लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले जेष्ठ पत्रकार मनोहर गायकवाड हे बोलतांना म्हणाले पत्रकरांनी गट तट बाजूला ठेऊन संघटीत राहावं आणि जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी निर्भीड लिखाण करावं असे प्रतिपादन केले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शक मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी बोलतांना सांगितले लोकशाही मराठी पत्रकार संघाने इतर ही पत्रकार संघाचे मान्यवर बोलावून सत्कार केला,तसेच सामाजिक, व्यसायिक क्षेत्रातील मान्यवरांचा ही सत्कार केला व पत्रकार दिन साजरा केला  याबद्दल लोकशाही मराठी पत्रकार संघाचे अभिनंदन काळे यांनी केलं.पुढे बोलतांना काळे म्हणाले पत्रकार संघ जरी वेगळा असला तरी ही कोणतीही समस्या असो आम्हाला कधी ही हाक द्या आम्ही तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहू अशी ग्वाही यावेळी काळे यांनी दिली. तसेच बुलडाणा जिल्ह्यात लोकशाही मराठी पत्रकार संघाने पत्रकारिता क्षेत्रात    महिलांचा वाढवलेला सहभाग कौतुकास्पद असल्याचे मत राजेंद्र काळे यांनी मांडले कार्यक्रमाचे आयोजन व प्रस्तिवीक लोकशाहि मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे यांनी केले सुत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष आदिल पठान यांनी तर आभार प्रदर्शन तालूका उपाधायक्ष कु. वंदनाताई गवई यांनी केले. तसेच बुलडाणा, देऊळगाव राजा मोताळा, व संग्रामपुर तालुका कार्यकारीणी घोषीत करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत जैवाळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रविणकुमार काकडे, अमोल हरणे, पंकज थिगळे, राहुल कासारे, संजय बरोटे, दत्ता हांडे, संतोष बनकर, राजेंद्र डोईफोडे, संदिप म्हस्के, गणेश शींदे, प्रकाश जेऊघाले, गणेश काकडे, उमा सुरडकर, जाकेरा बी शेख, लक्ष्मी गीर्‍हे, मेघा जाधव, निलेश कोल्हे, दिलीप हतागळे, राजीव जाधव, वैभव देशमुख, संतोष तायडे, चंद्रशेखर काळे, आकाश करवंदे, संकेत जाधव, पवन चव्हाण, राजेंद्र सुरकडकर, विनोद कळसकर यांच्यासह शेकडो पत्रकार बांधव उपस्थीत होते....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या