💥परभणीत ओबीसी आरक्षण बचाव समितीचा यल्गार ; आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार धरणे आंदोलन...!


💥जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले💥

परभणी (दि.०३ जानेवारी) - स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकिय आरक्षण कायम राखावे या मागणीसाठी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज सोमवार दि.०३ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या संघटना द्वारे सुरू केलेल्या या धरणे आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे नेते विविध संस्थांनी संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते  संघर्ष समितीच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली, जिल्हा प्रशासनास एक तपशीलवार निवेदन सादर केले त्याद्वारे ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम ठेवावे आरक्षण लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला व्याप एकलाव्या जात निहाय जनगणना करावी मंडल आयोगाने केलेल्या शिफारशी लागू कराव्यात यासह अन्य मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने राजकीय नेते विविध संस्थांनी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या