💥पुर्णेत कोरोना महामारीच्या नावावर प्रशासकीय अधिकारांचा अतिसक्तीने वापर ? अन्यायकारक दंड आकारणी...!


💥मोडका तोडका ॲटो चालवून कुंटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ॲटो चालकाला लावला १० हजार रुपये दंड💥

पुर्णा (दि.२३ जानेवारी) - परभणी जिल्हा प्रशासनाने कोरोना महामारीसह ओमिक्रॉन विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता दिवसा जमाबंदी तर रात्री संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत परंतु या कडक निर्बंधाची अंमलबजावणी करतांना जनसामान्यांसाठी वेगळा नियम आणि शासकीय अधिकारी/राजकीय पुढाऱ्यांसाठी वेगळा नियम अशी तरतूद करण्यात आली आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या प्रशासकीय नियमांची अंमलबजावणी करतेवेळी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनसामान्यांवर अन्याय होईल अश्या प्रकारे आपल्या अधिकाराचा अतिसक्तीने अन्यायकारक गैरवापर करता कामा नयें याचे सुध्दा निर्देश जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलिस प्रशासनाने द्यायला हवे अशी भावना जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे सुदैवच म्हणावे लागेल की या जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती आंचल गोयल यांच्या रुपाने अत्यंत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून अत्यंत कर्तव्यदक्ष व सर्वसामान्य जनतेसाठी सदैव तत्पर राहणारे  जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून सन्माननीय जयंतजी मिना यांच्या रुपाने पोलिस अधिक्षक लाभले संबंधित अधिकारी या जिल्ह्यात कार्यरत झाल्यापासून जिल्ह्यातील कारभार अत्यंत सुरळीतपणे चालल्याचे निदर्शनास येत आहे परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या प्रशासकीय नियमांची अंमलबजावणी करीत असतांना जनसामान्यांकडून होणाऱ्या चुकांनंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतेवेळी त्यांच्या परिस्थितीचा तरी विचार नक्कीच करायला हवा ना ?  

पुर्णा शहरासह तालुक्यात कोरोना महामारीसह ओमिक्रॉन विषाणूंचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या प्रशासकीय निर्देशांची दस्तुरखुद्द प्रशासकीय अधिकारीच पायमल्ली करीत असल्याचा गंभीर प्रकार येथील पंचायत समितीत बिडीओ वानखेडे यांनी दि.२० जानेवारी २०२२  रोजी आयोजित  केलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमावरून निदर्शनास आला तर दुसरीकडे कोरोना नियमांच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावणारे महाराष्ट्र वाहतूक पोलिसांकडून तालुक्यातील गौर येथील ॲटो चालक सलिम शेख नुर हा कुटुंबासह स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मोडका तोडका ॲटो चालवून कुंटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतांना ॲटोमध्ये जास्त मानस बसवल्याचे तसेच परवान नसल्याचे कारणावरून त्याला तब्बल १० हजार रुपये दंड आकारल्याची घटना घडल्यामुळे  या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच प्रवासी मिळत नसतांना त्या ॲटो चालकाने हा १० हजार रुपयांचा दंड तरी भरायचा कुठून असा त्याच्यापुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड यांनी पोलिस स्थानकाचा पदभार स्विकारल्यापासून सर्वसामान्य जनता व्यापारी वर्गाचा त्रास पुर्णपणे कमी झाला असून उलट पोलिस प्रशासनाची भुमिका त्यांच्या निर्देशा मुळे सर्वसामान्यांना आधार देणारी वाटू लागली असून त्यांनी महाराष्ट्र वाहतुक पोलिस कर्मचाऱ्यांना वाहन चालक व मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करतेवेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या