💥राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस आरोपीपर्यंत पोहचेना❓स्वस्त धान्य मिळत नसल्याने दिली होती तक्रार...!


💥मनूर खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक करा अन्यथा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने तीव्र आंदोलन💥 

[संबंधित अधिकाऱ्यांना दिले निवेदन ; पोलावार परिवाराचे केलं सांत्वन]


नांदेड (दि.०७ जानेवारी) - आर्य वैश्य समाजातील मनूर येथील समाज बांधव धोंडीबा शंकरराव पोलावार यांची निर्घुणपणे दिवसाढवळ्या हत्या केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने मनूर येथे भेट देऊन पोलावार परिवाराचे सांत्वन करण्यात आले परंतु राजकिय हस्तक्षेपामुळे पोलीस आरोपी पर्यंत पोहचत नाहीत.


या प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक करावी, अशी मागणी करणारे एक निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे. उमरी तालुक्यातील मनूर या गावातील स्वस्त धान्य दुकानदारांनी गावातील शिधापत्रिका धारकाकडून मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येत असल्याची तक्रार गावातील जवळपास दोनशे लोकांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन महसूल विभागाचे मंडल अधिकारी व तलाठी यांनी बुधवारी गावात जाऊन ग्राम पंचायत कार्यालयात चौकशी सुरू केली होती. दरम्यान अधिकाऱ्या  सोबतच स्वस्तधान्य दुकानदारांचा मुलगा हा कार्यालयात हजर होता. चौकशीच्या वेळी स्वस्त धान्य दुकानदार याच्या विरोधात गावकऱ्यांनी जवाब देत होते आपल्या विरोधात गावकरी जात आहेत आपले स्वस्त धान्य दुकान बंद होईल म्हणून स्वस्त धान्य दुकानदार यांचा मुलगा यांनी आपल्या साथीदारांसह ग्रामपंचायत कार्यालया समोर उभे असलेल्या धोंडीबा सावकार पोलावार यांना अरेरावीची भाषा करून मारहाण केली. गळा आवळला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वस्त धान्य दुकानदाराच्या बाबतीत गेल्या अनेक महिन्यापासून तक्रारी होत्या परंतु महसूल विभागाने या प्रकाराकडे जाणून-बुजून टाळाटाळ केली त्यामुळेच एवढा मोठा गंभीर प्रकार घडला असून एकाचा हकनाक बळी गेला आहे याला कारणीभूत असलेल्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध क** कारवाई करावी या खून प्रकरणातील पाच आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक करावी आणि वादग्रस्त असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना कायम स्वरूपी रद्द करावा अन्यथा महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या संदर्भात महासभेच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड व तहसीलदार माधवराव बोथीकर  यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.  याप्रसंगी नांदेड जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, राज्य संघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार ,राज्य उपाध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, जिल्हा सचिव प्रवीण काचावार,

प्रवीण चन्नावार, किशोर पबितवार, आदिनाथ गंगावार, पवन गादेवार, साईनाथ मेडेवार, साईनाथ कामीनवार , परेश चिंतावार, सुरेश येरावार,नरसिंग मुक्कावार, राम पत्तेवार, पांडुरंग महाजन, विजय पांपटवार, सुधीर उत्तरवार, गजानन चौधरी, अनिल सिरमवार, सुवेश पोकलवार, प्रशांत पोपशेटवार, विवेक काचावार, महेश पोलावार, बालाजी येरावार, राम येरावार, बालाजी कोंडावार, गजानन पोलावार,प्रमोद पोलावार, मनोज कोडगिरे, राम बिजमवार, साईनाथ काचावार, केशवराव उत्तरवार, निलेश पबितवार, गंगाप्रसाद पोलावार, दामोदर लाभसेटवार, श्याम लाभसेटवार, गिरिष पोलावार, शंतनु पोलावार, प्रवीण पोलावार, सोनू पोलावार, पंढरीनाथ दमकोंद्वार, साईनाथ बिजमवार, सुरेश पबितवार, अविनाश दासरवार, सचिन मामीडवार,गोविंद नलबलवार, अशोक मामिडवार,संतोष शिरूरकर, पवन पबितवार, दत्ताहरी पालदेवार, प्रसाद येरावार, दिलीप चिटमलवार, शंकर पिंपरवार, राघवेंद्र पबितवार, दत्तात्रेय लाभसेटवार, गणेश काचावार, विठ्ठल मुक्कावार, गिरीश निलावार, बालाजी बोपेवार, अमित उत्तरवार, व्यंकटेश धनपलवार, दयानंद कवटिकवार, लक्षण दमकोंडवार,संकेत मुक्कावार,संतोष मुक्कावार, कुणाल पबितवार, श्रीनिवास मुक्कावार, सचिन मुक्कावार, संजय निलावार, माणिकराव चिटमलवार, निलेश पबितवार,नंदू -याकावार, आदीसह महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे मुदखेड, भोकर, हिमायतनगर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, बाराळी, मुखेड, जांब, सिंधी आदीसह जिल्ह्यातील आर्य वैश्य समाजातील बहुसंख्य समाज बांधव व मनूर गावातील सरपंचासह गावकरी उपस्थित होते.

उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी आरोपीला अटक करण्यासाठी आमची तीन पथके रवाना झाली असून येणाऱ्या 24 तासात आम्ही आरोपीला अटक करू असे आश्वासन दिले तहसीलदार माधवराव बोथीकर यांची महासभेच्या पदाधिकार्‍यांनी रात्री उशिरा भेट घेऊन स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाना रद्द करण्याबाबत आग्रह धरला असता त्यांनी तत्काळ स्वस्त धान्य दुकानदारांचा मुलगा खून प्रकरणातील गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याने स्वस्त धान्य दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी याकडे प्रस्ताव दिल्याचे सांगून तसे लेखी पत्र दिले आहे.

गुन्हेगाराला राजकीय आश्रय ;-

मनूर येथील खून प्रकरणात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीला राजकीय आश्रय मिळत  आहे. आरोपीला अटक करण्यात येऊ नये, यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर होत असल्याने आरोपी हे फरारी आहेत आरोपींना राजाश्रय मिळत असल्याचे गावातील लोकांनी सांगितले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या