💥दैनिक धर्मयोद्धाच्या प्रथम अंकाचे प्रकाशन पालकमंत्री ना नवाब मलिक यांच्या हस्ते संपन्न...!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ खासदार फौजिया खान या होत्या💥


परभणी (दि.२६ जानेवारी) - प्रभावती नगरीत नव्याने सुरु झालेल्या  दैनिक धर्मयोद्धा प्रथम अंकाचे प्रकाशन आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ता दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नवाब मलिक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


शहरातील बी रघुनाथ सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ खासदार फौजिया खान तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ॲड. विजयराव गव्हाणे,माजी खा तुकारामजी रेंगे पाटील,ऍड अशोकजी सोनी,प्रसिद्ध उधोजक अरुण मराठे,मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र अध्यक्ष सुभाषराव जावळे,वसिखभाई इनामदार,ऍड पवन निकम,टी जी सूर्यवंशी,प्रा.के पी कणके,डॉ अनिल कान्हे पाटील,डॉ राजगोपाल कालानी,सुधाकर खराटे,संभाजीसेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर पाटील,गजानन लव्हाळे आदींची उपस्थिती होती दैनिक धर्मयोद्धा चे संपादक रामेश्वर शिंदे,कार्यकारी संपादक अरुण पवार,जिल्हाप्रतिनिधी कुणाल गायकवाड  विशाल कळसाईतकर आदींनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आमदार डॉ राहुल पाटील व डॉ विवेक नावंदर यांनीही दैनिक धर्मयोद्धा च्या प्रकाशन प्रसंगी शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या