💥पदव्युत्तर मेरिट आलेल्या कु. चव्हाण हिचे गावकऱ्यांकडून सत्कार....!


💥प्रतिभावंत मुलीची राष्ट्रीय बालिका दिनी ग्रामस्थांकडून सन्मान💥

फुलचंद भगत

वाशिम:-मानोरा तालुक्यातील दुर्गम असलेल्या कारपा या गावची कन्या कु. दिपपूजा चव्हाण यांनी संत गाडगेबाबा अमरावती विश्वविद्यालया मध्ये इतिहास या विषयात पदव्यूत्तर लेखी परीक्षेत सातवा मेरीट क्रमांक प्राप्त केल्याने गावातील सन्माननीय व्यक्तींच्या हस्ते कु.दिपपुजा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कु.दीपपूजा धनसिंग चव्हाण यांनी इंग्रजी वाड्मय या विषयांमध्ये सुद्धा प्राविण्य प्राप्त केलेले आहे. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या परीक्षा निकालामध्ये तब्बल 80.65% गुण कु. चव्हाण यांनी मिळविले आहेत.कारपा ह्या गावची कन्या विद्यापीठात गुणानुक्रमे सातवी आल्यामुळे तिचा गुणगौरव व्हावा यासाठी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी तिच्या घरी जाऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी गावाचे माजी पोलीस पाटील देवराव इंगोले, श्रीकृष्ण मनवर, विलास आडे, प्रकाश राठोड आणि दीपपूजा यांचे माता, पिता,भगिनी ई.उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या