💥सकारात्मक अन् नकारात्मक पत्रकारीतेच्या नावावर मर्जीतील वेठविगारांना हाताशी धरून पत्रकारांवर होतेय चिखलफेक...!


💥भ्रष्ट अधिकारी लोकप्रतिनिधींच्या 'ताटाखालची मांजर' हातात लेखणी धरून जनसामान्यांना खरच न्याय देतील काय ?💥

✍️शोध आणि बोध ;- 

सकारात्मक पत्रकारीतेच्या नावावर सत्याच्या बाजूने असत्याच्या विरोधात निर्भीडपणे परखड लिखाण करणाऱ्या जनहीतवादी पत्रकारीतेला मुठमाती देवून भ्रष्ट नौकरशाह तत्वभ्रष्ट राजकारणी,शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण करणाऱ्या भ्रष्ट संस्थाचालक माफिया आणि प्रस्थापितांच्या हितास्तव अक्षरशः वेठविगारी अर्थात गुलामगिरी पत्करून ताटाखालच्या मांजरी बनून पत्रकारीता करणाऱ्या वेठविगार (गुलाम) पत्रकारांना हाताशी धरून तथाकथित 'सकारात्मक' पत्रकारीतेच्या नावावर पत्रकारांमध्ये संभ्रम निर्माण करून सत्याच्या बाजूने निर्भीड व परखड लिखाण करणाऱ्या अस्सल जनहीतवादी पत्रकारीतेला 'नकारात्मक' पत्रकारीतेचे लेबल चिटकवून बदणाम करणाऱ्या वेठविगार पत्रकारांचा खरा चेहरा हल्ली हळुवारपणे उघड होतांना दिसत असून आपल्या भ्रष्ट कारभारावर पांघरूण टाकायचे असेल तर दोन चार वेठविगारांना हाताशी धरून त्यांचा वापर पत्रकारांमध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी सोईस्कररित्या केल्या जात असल्याचे निदर्शनास येतय काही वेठविगारांनी 'नौकरदार सह पत्रकार' अशी दुहेरी भुमिका साकारल्यामुळे भ्रष्ट नौकरशहांसह तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधी माफिया प्रस्थापितांचेही चांगभले होतांना पाहावयास मिळत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हिताची अस्सल जनहीतवादी पत्रकारीता हळुवारपणे लोप पावतांना पाहावयास मिळत आहे आज गुरुवार दि.०६ जानेवारी रोजी 'दर्पण दिन' असल्याने हा विशेष लेख...


महाराष्ट्र राज्यात इंग्रजांच्या काळात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले 'दर्पण' नावाचे जनहीतवादी वर्तमानपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला राज्याची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेत सुरू झालेले 'दर्पण' हे वर्तमान पत्र 'दर्पणकार' बाळशात्री जांबेकर यांनी त्यांचे सहकारी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने सुरू केले होते दर्पण वर्तमानपत्राचा पहिला अंक ०६ जानेवारी १८३२ या दिवशी प्रकाशित झाला जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ वर्तमानपत्र आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.


त्याचवेळी इंग्रजी  सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे इंग्रजांच्या अत्याचारी जुलमी राजवटी विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशानेच 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांनी 'दर्पण' अर्थात 'आरसा' नावाच्या पहिल्या मराठी वर्तमानपत्राची सुरूवात ०६ जानेवारी १८३२ सुरुवात केल्याने महाराष्ट्र शासनाने आज ६ जानेवारी हा दिवस 'पत्रकार दिन' म्हणून घोषित केला खरा परंतु शासकीय पातळीवर मात्र हा दिवस कोणत्याही शासकीय कार्यालयात साजरा होत नाही आणि झाला तरी अश्या कार्यक्रमांना वेठविगारांशिवाय अन्य कोणात्याही जनहीतवादी पत्रकाराला निमंत्रण दिले जात नाही हे विशेष.

भ्रष्टाचारी नौकरशाह तत्वभ्रष्ट राजकारणी यांच्यासह प्रस्थापित भ्रष्ट  संस्थाचालक यांनी पत्रकारांमध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी भेदभावनितिचा अवलंब केल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराला आपोआपच संरक्षण कवच मिळायला लागले असून काही वेठविगारांना हाताशी धरले की जनसामान्यांसह शासनाला सुध्दा सुरळीतपणे चुना लावता येवू शकतो याची जाणीव भ्रष्टाचाऱ्यांना झाली आहे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी सत्याच्या बाजूने अत्यंत परखडपणे लिखाण केले तर नकारात्मक पत्रकारीता आणि असत्याच्या बाजूने आर्थिक हितसंबंध जोपासत ताटाखालचे मांजर बनून लिखाण केले की सकारात्मक पत्रकारीता ? यालाच पत्रकारीता म्हणायचे काय ? 

महाराष्ट्र राज्यातील आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर,'बहिष्कृत भारत' वर्तमानपत्राची सुरूवात करून दिन-दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लेखणी झिजवणारे परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,केसरी वर्तमान पत्राची सुरूवात करून इंग्रजांच्या अत्याचारी राजवटीला आवाहन देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जनहीतवादी पत्रकारीतेचा आदर्श घेऊन जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी निर्भिडपणे लिखाण करणाऱ्या पत्रकारांना एकाकी पाडण्याचा व बदणाम करण्याचा कुटील डाव भ्रष्टाचारी लांडग्यांच्या कळपात वावरणाऱ्या वेठविगार (गुलाम) पत्रकारांतील आधुनिक आर्य चानक्क्यांकडून सोईस्कररित्या होत असल्यामुळे जनहीतवादी पत्रकारीता लोप पावत असल्याचे सद्यातरी निदर्शनास येत आहे......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या