💥परभणी येथील तक्षशिला बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष पूज्य भदंत कश्यप थेरो यांचे दुःखद निधन....!


💥परभणी येथील ऐतिहासिक आक्रोश मोर्चा असो वा दलित-मुस्लिम एकताचे कार्यक्रम ते आवर्जून सहभागी होत असत💥

परभणी (दि.३१ जानेवारी) - येथील तक्षशिला बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष पूज्य भदंत कश्यप थेरो यांचे आज सोमवार दि.३१ जानेवारी रोजी मध्यरात्री ०१-०० वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने वाशीम येथे दु:खद निधन झाले. ते 58 वर्षांचे होते अत्यंत मनमिळाऊ आणि मितभाषी स्वभावाचे भंतेजी धम्मकार्यात तर सक्रिय होतेच; पण सामाजिक कार्यातही ते हिरिरिने सहभाग घेत असत. 

परभणी येथील ऐतिहासिक आक्रोश मोर्चा असो वा दलित-मुस्लिम एकताचे कार्यक्रम ते आवर्जून सहभागी होत असत या अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटनेविषयी अखिल भारतीय भारतीय भिक्खू संघाचे परभणी-हिंगोली जिल्हाध्यक्ष पूज्य भदंत मुदीतानंद थेरो यांच्याशी संपर्क साधला असता भंतेजींचे पार्थिव परभणी येथे आणण्यात येणार असल्याचे सांगितले.

पूज्य भदंत कश्यप यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

ओम मणि पद्मे हूं !!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या