💥पुर्णा तहसिलदारांची निवडणूक कामात हलगर्जीपणा व मनमानी करणाऱ्या बिएलओ वर कारवाई करण्यास टाळाटाळ...!

 


💥तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान शेख बाबू यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा💥

पुर्णा (दि.२१ जानेवारी) - येथील तहसिल प्रशासनाने निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या बिएलओ यांच्या हलगर्जी व मनमानी कारभाराची अनेक प्रकरण उघडकीस येत असून असेच एक प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे.यादी भाग क्रमांक १८१ चे बिएलओ यांच्याशी तक्रारदार तथा सामाजिक कार्यकर्ते शेख ईरफान शेख बाबू यांनी त्यांच्या कुटुंबातील ४ नावे यादी भाग क्र.१८१ मधील अनुक्रमांक ३२७,३२८,३२९ व १०७३ ही चार नावे यादी भाग क्रमांक १८२ मध्ये स्थलांतर करण्यासाठी बिएलओ कुऱ्हे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी सांगितल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून त्यांच्याकडे दिली यावेळी तक्रारदार शेख इरफान यांनी बिएलओ यांना कागदपत्र जमा केल्याची पोहच पावती म्हणून झेरॉक्सवर सही मागितली परंतु संबंधित बिएलओ कुऱ्हे यांनी त्यांना पोहोच पावतीची काही आवश्यकता नाही तुमची सर्व कागदपत्र बरोबर आहेत तुमची चार नावे भाग क्रमांक १८२ मध्ये स्थलांतरीत होऊन जातील यानंतर संबंधित बिएलओ वर विश्वास करून तक्रारदार शेख इरफान निवांत झाले परंतु दि.०५ जानेवारी २०२२ रोजी नवीन निवडणूक यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्या यादीत त्यांनी दिलेल्या चार नावा पैकी एकही नावाचा समावेश करण्यात आला नसल्यामुळे संबंधित बिएलओ कुऱ्हे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा करीत आपला विश्वासघात केल्याचे त्यांना लक्षात आले या संदर्भात शेख इरफान शेख बाबू यांनी बिएलओ कुऱ्हे यांच्या विरोधात दि.०६ जानेवारी २०२२ रोजी तहसिलदार/तालुका/जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली परंतु संबंधित बिएलओ विरोधात कारवाई करण्यास तहसिल प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्यामुळे त्यांनी दि.१७ जानेवारी २०२२ रोजी तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल करून संबंधित बिएलओ विरोधात कारवाई न झाल्यामुळे दि.२७ जानेवारी २०२२ पासून तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या