💥राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विरोधकांच्या स्वप्नांची उडवली धुळधान...!


💥राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहण्याचा निर्णय ; जिल्हाध्यक्ष पदावर आ.बाबाजानी दुर्रानी कायम राहणार💥

परभणी (दि.०६ जानेवारी)  :  परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण करण्याचा विरोधकांचा कुटील डाव उधळून लावण्यात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणारे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मुंबईत राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींबरोबर घेतलेल्या गाठीभेटी व केलेल्या गुफ्तगू नंतर समर्थकांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडावयाचा मोठा निर्णय गुंडाळला असल्याची माहिती हाती आली आहे दरम्यान आमदार दुराणी हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कायम राहतील असे संकेत आहेत.

      आमदार दुर्राणी यांनी गेल्या महिन्यातच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींवरील नाराजी पोटी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्या पाठोपाठ दुर्राणी यांच्या समर्थकांनीसुध्दा राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या कृतीने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात निश्‍चितच खळबळ उडाली. या दरम्यानच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी तात्काळ दुर्राणी व समर्थकांबरोबर संपर्क साधून पक्ष प्रवेशाचे निमंत्रण देवून ठेवले. दुर्राणी यांनी काँग्रेसचे युवा नेते कन्हैय्या कुमार यांची मुंबईत भेट घेतली, त्यांच्यासमवेत गुफ्तगू सुध्दा केले. त्यानंतर दुर्राणी समर्थकांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते मंडळींबरोबर मुंबईत गाठीभेटी घेवून काँग्रेस प्रवेशाचा संकल्पसुध्दा जाहीर केला. एकीकडे या घडामोडी वेगाने सुरु असतांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार दुर्राणी यांना मुंबईत पाचारण केले. त्यांच्याबरोबर हितगूज केले. नाराजी मागील कारणांबाबत विचारणा केली. नाराजी दूर केली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेवूया, असेही नमूद केले. आमदार दुर्राणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. या भेटीतूनही दोघात चर्चा झाली.

       या पार्श्‍वभूमीवर बुधवारी दि.०५ जानेवारी २०२२ रोजी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आमदार दुर्राणी यांच्याबरोबर पुन्हा गुफ्तगू केले. त्यानंतर हे दोघे एकमेकांना पेढा भरवीत असतांनाचे छायाचित्र बैठकीअंती व्हायरल करण्यात आले. त्यामुळेच जिल्ह्यातील राजकीय वर्तूळातसुध्दा दुर्राणी यांचा राष्ट्रवादीस सोडचिठ्ठी द्यावयाचा निर्णय गुंडाळला गेला असल्याची कल्पना आली. दुर्राणी समर्थकांनासुध्दा तो मेसेज सहजपणे लक्षात आला.

      दरम्यान, आमदार दुर्राणी यांनी स्वतः राष्ट्रवादीतून आपण बाहेर पडत आहोत, असे कधीही म्हटले नव्हते. परंतु, त्यांचे समर्थक खुलेआमपणे काँग्रेस प्रवेशाबाबत व प्रवेशाच्या मुहूर्ताबाबतसुध्दा चर्चा करीत होते. गेल्याच महिन्यात पक्षप्रवेशाचा सोहळासुध्दा पाथरीच्या आखाड्यावरच होणार होता. परंतु, प्रत्यक्षात मुहूर्त लागेना, हे स्पष्ट झाल्यानंतर दुर्राणी हे राष्ट्रवादीतच राहतील. सहाजिकच समर्थकांनासुध्द राष्ट्रवादीचाच झेंडा खांद्यावरुन उतरविता येणार नाही, हे उमजले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या