💥पुर्णेतील प्रा.डॉ.मनीषा काशिनाथराव पाटील यांना पिएचडी प्रदान...!


💥त्यांच्या संशोधनाचा विषय 'डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या स्त्री स्वातंत्र्य संकल्पनेचा चिकित्सक अभ्यास' हा होता💥


पुर्णा (दि.२३ जानेवारी) - नांदेड येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ येथून श्री गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालयातील प्रा.डॉ.मनीषा काशिनाथराव पाटील यांना पिएचडी प्रदान करण्यात आली त्यांच्या संशोधनाचा विषय 'डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या स्त्री स्वातंत्र्य संकल्पनेचा चिकित्सक अभ्यास' हा होता त्यांना नुतन महाविद्याल सेलू येथील प्रा.डॉ.एस.एस.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पिपल्स महाविद्यालय नांदेड येथील उपप्राचार्य डॉ.अशोक सिध्देवाड यांच्या सहकार्यातून हा शोधनिबंध त्यांनी पुर्ण केला आहे.

त्यांच्या या यशा बद्दल डॉ.आदीनाथ इंगोले,डॉ.अजय टेंगसे,डॉ.डि.आर.येवले,श्री गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालय,स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालय,अभिनव विद्या विहार प्रशाला,केंद्रीय कन्या शाळा,समता विद्यालय,इंदिरा गांधी विद्यालय पुर्णा येथील प्राध्यापक,शिक्षक तसेच त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या मातोश्री,त्यांचे बंधू-भगिनी तसेच नातेवाईक मित्र परिवारातील सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या