💥हॉकी टूर्नामेंट ; सी.ओ.एस. जालंधरचा धडाका सुरुच,भोपाल संघाला 6 वि. 0 ने नमवलं...!


💥खालसा यूथ क्लब नांदेडची अमरावतीवर मात💥

✍️रवींद्रसिंघ मोदी 

नांदेड (दि.05 जानेवारी) : श्री दुष्टदमन क्रीडा व युवक मंडळ हॉकी संघटनेच्या वतीने येथील खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर सुरु असलेल्या 48 व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या तिसऱ्या दिवशी कॉर्प्स ऑफ सिग्नल जलंधर संघाने आक्रामक आणि शैलीदार हॉकी खेळाचे प्रदर्शन करून भोपाल विरुद्ध 6 वि. 0 फर्काने मोठे यश संपादन केले. तसेच आपल्या खेळाने संघाने रसिकांचे मनही जिंकले. तर दूसरीकडे इटारसी, इएमइ जलंधर ने त्यांचे सामने जिंकले. नांदेडच्या खालसा यूथ क्लबला सुर सापडले असून अमरावती संघाचा 4 विरुद्ध 1 गोलाने पराभव करून विजयाची नोंद केली.


बुधवार, दि. 5 रोजी पहिला हॉकी साखळी सामना इटारसी हॉकी क्लब विरुद्ध एक्सेलेंस अकादमी पुणे संघा दरम्यान झाला. पुणे संघाने सामन्यात 22 व्या मिनिटलाच पहिला गोल केल्यानंतर देखील इटारसी संघाने 3 वि. 1 असा सामना जिंकला. इटारसी संघाच्या वतीने 45 व्या मिनिटाला सुंदरम राजावत, 48 व्या मिनिटास शुआतक जेम्स आणि 53 व्या मिनिटाला शॉन गाडविन याने गोल केलेत. 

दूसरा सामना इ.एम.इ. जलंधर विरुद्ध हॉकी औरंगाबाद संघादरम्यान खेळला गेला. जलंधर संघाने 2 वि. 0 असा विजय मिळवला. अमनजोत भंभर याने दोन्ही गोल केले. औरंगाबाद संघाला गोल करता आले नाही तीसरा सामना मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि चार साहबजादा हॉकी अकादमी दरम्यान अनिर्णीत राहिला. मुंबई संघातर्फे 6 व्या मिनिटाला अजमल याने गोल करून आघाडी मिळवली होती. पण नांदेड संघाच्या अजय नंदे याने गोल करून बलाढ्य मुंबई विरुद्ध सामना बरोबरीत रोखण्यात मोलाची भूमिका पार पाडली. 


आजचा दिवस कॉर्प्स ऑफ सिग्नल जलंधर संघाने गाजवला. भोपाल इलेवन संघा विरुद्ध झालेल्या सामन्यात जलंधर संघाने 6 वि. 0 असा मोठा विजय मिळवला. जालंधरच्या प्रदीप मोर या खेळाडूने तीन पेनल्टी कार्नर मध्ये 3 गोल करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तर दिपक पाल, पंकज आणि अंकुश यांनी प्रत्येकी एक एक गोल केला पाचवा सामना आर्टलेरी नाशिक आणि कस्टम मुंबई संघात अनिर्णीत राहिला. दोन्ही संघाने एक - एक गोल केला. 

आजचा साहवा सामना एसएस हॉकी क्लब औरंगाबाद आणि खालसा यूथ क्लब नांदेड संघात खेळला गेला. नांदेड संघाने 4 वि. 1 गोल अंतराने सामना जिंकला. खालसा यूथ क्लब तर्फे संगम याने 22 व्या, राजेंद्र सिंघ याने 28 व्या, रौनकसिंघ याने 35 व्या तर हर्षदीपसिंघने 47 व्या मिनिटास गोल केले. अमरावती संघातर्फे मोहम्मद आसिफ याने 40 व्या मिनिटाला गोल केला. खालसा यूथ क्लबचा खेळ आज नौलौकिक प्रमाणे खेळला गेला. हरविंदरसिंघ कपूर यांचे मार्गदर्शन आणि गुरमीतसिंघ नवाब यांनी संघाला योग्य दिशा देण्यात परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या