💥नांदेड येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन 3 रोजी....!


💥48 व्या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी पूर्ण💥

✍️स.रवींद्रसिंघ मोदी 

नांदेड (दि.1 जानेवारी) : देशात मागील 50 वर्षापासून राष्ट्रीय खेळ हॉकीच्या प्रचार प्रसारात मोलाचे योगदान देऊन राष्ट्रीय आणि अंतर्राष्ट्रीय खेळाडू घडवणारी प्रतिष्ठित अशा अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटची सुरुवात दि. 3 जानेवारी रोजी होत आहे. या स्पर्धेचे उदघाटन गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहिबचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले आणि संतबाबा तेजासिंघजी मातासाहेब वाले यांच्या हस्ते संयुक्तरीतिया होणार आहे. अशी माहिती शिरोमणि दुष्टदमन क्रीडा युवक मंडळ नांदेडचे अध्यक्ष आणि नगरसेवक स.गुरमीतसिंघ नवाब यांनी येथे एका प्रसिद्धी पत्राकान्वय दिली आहे. 


श्री गुरमीतसिंघ नवाब यांनी पुढे माहिती दिली की श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाशपर्वास समर्पित 48 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या वरील उद्धघाटन कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून गुरुद्वारा बोर्डाचे सचिव स. रविन्द्रसिंघ बुंगाई, गुरुद्वारा सदस्य स. गुरमीतसिंघ महाजन, स. मनप्रीतसिंघ कुंजीवाले, अधीक्षक स. गुरविंदरसिंघ वाधवा यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच हॉकी स्पर्धेला मोलाची मदत करणारे सर्व घटक, गुरुद्वारा सदस्य, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि सहकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.  स्पर्धेचे आयोजन खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर होणार असून हॉकी इंडियाच्या निर्देशानुसार व नियमावालीनुसार 16 संघाचे लीग सामने व नंतर बाद फेरीचे सामने खेळविले जाईल. 


स्पर्धेत सहभागी होणारे संघ दर्जेदार असून राष्ट्रीयस्तराचे प्रतिभावंत खेळाडू येथे राष्ट्रीय खेळ हॉकीचे प्रदर्शन घडवून आणतील. श्री नवाब म्हणाले की वरील स्पर्धा सतत 50 वर्षापासून नांदेडच्या पावन भूमीत आयोजित होताहेत यामुळे नांदेडचे नावलौकिक सर्वत्र होत आहे. येथे या स्पर्धा आयोजनात अनेकजण मोलाचे सहकार्य करतात. खेळाडूंचा उत्साह शतगुणित करतात त्यामुळे एवढी मोठी वाटचाल या स्पर्धेने साध्य केलेली आहे. वरील स्पर्धा दि. 3 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान खेळविले जातील असे ही ते म्हणाले. स्पर्धेत प्रथम विजेता संघाला एक लाख रूपये रोख बक्शीस आणि फिरते चषक तर उपविजेत्या संघास 51 हजार रूपये रोख आणि चषक देण्यात येणार आहे. सर्व हॉकी रसिकांनी राष्ट्रीय खेळाचे सामने पहाव्यात अशी विनंती टूर्नामेंट कमेटी पदाधिकारी आणि सदस्य मंडळातर्फे करण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या