💥परभणी शहरात काल शनिवार दि.०८ जानेवारी रोजी 2 हजार 567 जणांचे लसीकरण....!


💥त्यापैकी 15 ते 18 वयोगटातील 1163 मुलांचे लसीकरण शाळा व महाविदयालयामध्ये पुर्ण करण्यात आले💥

परभणी (दि.09 जानेवारी) - परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने कोविड – 19 अंतर्गत शहरात 48 बुथवर लसीकरण मोहीम राबवीण्यात आली आहे. या वेळी आयुक्त देविदास पवार, उपायुक्त प्रदिप जगताप यांनी सर्व बुथवर पाहणी करुन नागरीकांना लसीकरण करण्याचे आवाहान केले. शहरामध्ये दि. 07/01/2022 रोजी 2567 लाभार्थ्यांचे लसीकरण पुर्ण झाले आहे.

 त्यापैकी 15 ते 18 वयोगटातील 1163 मुलांचे लसीकरण शाळा व महाविदयालयामध्ये पुर्ण करण्यात आले आहे. शहरामध्ये प्रत्येक प्रभागांतर्गत नागरीक यांनी लस घेण्यासाठी सहाकार्य करावे. आरोग्य कर्मचारी, पालक अधीकारी, अशा वर्कर, एएनएम प्रत्येकाचे घरी जावुन लसीकरण झाले किंवा नाही याची शहानिशा करत आहेत. शहरातील प्रत्येक शाळा, महाविदयालयातील विदयार्थ्यांना शीक्षक व प्राध्यापकांनी व तसेच पालकांनी त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करावे. शहरातील शाळा, महाविद्यालयामध्ये लसीकरण सुरू आहे. शहरामध्ये नागरीकांचा लसीरकणाकडे कल वाढत असुन लसीकरणाला चांगला प्रतीसादर मिळत आहे. शहरातील नागरीकांना लसीकरण पुर्ण करून घ्यावे असे आवाहन सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजु लाला यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या