💥हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 04 रुग्ण,तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज...!


💥रुग्णालयात 14 रुग्णांवर उपचार सुरु💥

हिंगोली (दि.06 जानेवारी) : जिल्ह्यात  कोविड-19 चे नवीन 04 पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आले आहेत, तर 01 रुग्ण बरा झाल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज घडीला 14 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 04 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 79 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 669 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 14 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली  यांनी कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या