💥जात विरहित समतामूलक समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता....!


💥प्रा.डॉ. ह.नी.सोनकांबळे यांचे प्रतिपादन💥

पूर्णा : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्णा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन बुद्ध वीहार समिती भारतीय बौद्ध महासभा व महिला मंडळाच्या वतीने भंते पयावंश ,संघ रत्न यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते . अभिवादन सभेच्या अध्यक्षस्तानी माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे हे होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रा. डॉ. ह.नी. सोनकांबळे हे होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक व भारतीय राज्यघटना  निर्मिती कार्यावर सखोल अभ्यास पूर्ण व्याख्यानामध्ये त्यांनी प्रकाश टाकला भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून त्यांना जात विरहित समतामूलक समाज अभिप्रेत होता.


महामानव भगवान बुद्ध संत कबीर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांना अभिप्रेत असलेलं कल्याणकारी राज्य त्यांना अभिप्रेत होत. भारतीय राज्यघटनेमध्ये या महापुरुषांच्या विचाराचे प्रतिबिंब पहावयास मिळते 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन एका बाजूला या दिवशी बाबासाहेब आंबेडकर गेल्याच दुःख आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी दिलेले विचार त्यांचं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी अनुयायांवर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणन्याची प्रकर्षाने आवश्यकता आहे त्यामध्येच समाजाचे व देशाचे कल्याण आहे.असे प्रतिपादन त्यांनी केले भंते पया वंश यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां मध्येअसलेली प्रज्ञा शील करुणा मंगल मैत्री आचरणात आणण्याचे आव्हान केले अध्यक्षीय समारोप मध्ये प्राचार्य मोहनराव मोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे भाग्यविधाते आहेत असे प्रतिपादन केले.

अभिवादन सभेला ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड, एडवोकेट धम्मदिप जोंधळे, सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित, नगरसेवक मधुकर गायकवाड वीरेश कसबे महबूब भाई कुरेशी, बौद्धाचार्य त्रंबक कांबळे कामगार नेते अशोक कांबळे प्राध्यापक अशोक कांबळे विजय जोंधळे, किशोर ढाकरके अतुल गवळी अमृतराव मोरे टी.झेड कांबळे  दिलीप गायकवाड पी. जी. रणवीर प्राचार्य डॉ केशव जोंधळे श्यामराव जोगदंड ज्ञानोबा जोंधळे बाबाराव वाघमारे  लक्ष्मण शिंदे उमेश बराटे आदींची उपस्थिती होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन व ध्वज अर्ध्यावर उतरून अभिवादन  जेष्ठ नेते प्रकाश कांबळे,नगराध्यक्षांच्या प्रतिनिधी संतोष एकलारे,न. प. गट नेते उत्तम खंदारे प्राचार्य मोहनराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.भंते पायवंश ,संघरारत्न यांनी उपस्थितांना त्रिषरण पंचशील दिले दुपारी श्री गुरु गुरु गोविंद सिंग ब्लड बँक बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते चैत्यानंद वाघमारे, भीमा वाहुळे यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले सूत्र संचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विजय खंडागळे,सुरज जोंधळे, सोनू काळे व भारतीय बौद्ध महासभा बुद्धविहार समिती महिला मंडळ यांनी प्रयत्न केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या