💥परळी शहरातील औष्णिक विद्युत केंद्रांचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड ईगल ब्रँड आयकॉन पुरस्काराने सन्मानित...!


💥ईगल फाऊंडेशन तर्फे "ईगल ब्रँड आयकॉन" पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते💥

परळी / प्रतिनिधी

परळी - सामाजिक  क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना आणि कोवीड काळात केलेल्या कार्याचा गौरव ईगल फाऊंडेशन कडून केला जातो.ईगल फाऊंडेशनतर्फे " ईगल ब्रँड आयकॉन "  पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.परळी शहरातील औष्णिक विद्युत केंद्रांचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड हे मुख्य अभियंता झाल्यापासून, अनेक सामाजिक क्षेत्रात काम करत,हिरिहिरीने सहभागी होऊन स्वतःला झोकून योगदान देतात.ज्या ज्या ठिकाणी ते रुजू झाले त्या त्या ठिकाणी त्यांनी सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले आहे.


राष्ट्रसंत भगवान बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे अभिनव उपक्रम यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी व्याख्यान, जनजागृती कार्यक्रम वृक्षारोपण आदि तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर, संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात पुढे असतात.तसेच, औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून सांस्कृतिक चळवळ जोपासण्यासाठी त्यांची सतत धडपड असते.परळी औष्णिक विद्युत केंद्राला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुवर्णमहोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला.तसेच उर्जेबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी उर्जा संवर्धन आणि बचतीची सवय लावण्यासाठी जनजागृती केली आहे. याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.कोरोना काळात त्यांनी अनेक रुग्णालयांना कोरोना किट  वाटप करण्यात आली.कोरोनाच्या काळात नाशीक येथे सिव्हील हॉस्पीटलला ०५बायपासचे वितरण तसेच पोलीस कर्मचर्‍यांकरीता १० हजार माक्स सोबत २०० पिपीई किट चे वाटप, या वर्षी अंबाजोगाई व परभणी येथील सरकारी रूग्णालयात कोविड रूग्णाकरीता ऑक्शीजन प्लॅट उभारण्यात मोलाचा वाटा. बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे सेवागौरव या विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

याच सामाजिक कार्याची दखल घेत यावर्षीचे ब्रँड आयकॉन ठरले आहेत परळी औष्णिक विद्युत केंद्रांचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना जाहीर झाला.दि.२६ /१२/२०२१ रोजी ए.सी.सेमिनार हॉल,पंढरपूर येथे एका विशेष समारंभात देण्यात आला.पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार स्विकारताना मुख्य अभियंता मोहन आव्हाड आणि सौ.आव्हाड यांनी स्विकारला.मा.आ.रामहरी रूपनर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून सन्मानित केले गेले.यावेळी आव्हाड यांच्या मातोश्री भावूक झाल्या. पुरस्काराला उत्तर देताना मुख्य अभियंता मोहन आव्हाड म्हणाले की,या पुरस्कारामुळे आणखी सामाजिक जबाबदारी वाढली आहे.तसेच, पुरस्कार मला मिळालेला नसून,हा पुरस्कार सर्व सहकार्यांचा आहे.त्यामुळे त्यांना समर्पित करतो.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या