💥पुर्णेतील बस स्थानक परिसरातील कोहिनूर वर्क शॉप मध्ये कारपेट टाकीचा भयंकर स्फोट...!


💥कारपेट टाकीच्या स्फोटात दुकान मालकासह दुचाकीला वेल्डींग करण्यासाठी आलेला एक ग्राहकही गभीर जख्मी💥 


पुर्णा (दि.०५ डिसेंबर) - शहरातील बसस्थानक परिसरातील कोहिनूर वेल्डींग वर्क शॉप या दुकानात आज रविवार दि.०५ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२-०० ते १२-३० वाजेच्या सुमारास दुचाकी वाहनास गॅस वेल्डिंग मारत असतांना अचानक कारपेट टाकीचा भयंकर स्फोट झाल्याने दुकान मालकासह दुचाकी वाहनास वेल्डिंग मारण्यास आलेला एक ग्राहक ही गंभीर जख्मी भाजल्याची दुर्दैवी घटना घडली स्फोट इतका भयंकर होता की स्फोटाच्या आवाजाने परिसर अक्षरशः हादरून गेल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.


या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे शहरातील बसस्थानक परिसरातील मुख्य मार्गावर शेख नसीर यांचे कोहिनूर वेल्डींग वर्क शॉप असून या दुकानावर आज रविवार दि.०५ डिसेंबर रोजी दुपारी १२-०० ते १२-३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कुंभारवाडी (अजदापूर) येथील शेख सिध्दीक शेख खदीर वय ४५ वर्षे व्यवसाय हमाली हे आपल्या दुचाकी वाहनास गॅस वेल्डिंग मारण्यासाठी आले होते यावेळी दुकान मालक शेख नसीर हे दुचाकीस वेल्डिंग मारत असतांना अचानक कारपेट टाकीतील गॅसचा स्फोट होऊन टाकी फुटल्यामुळे वेल्डर नसीर यांच्यासह शेख सिध्दीक शेख खदीर हे गंभीररित्या भाजल्या गेल्यामुळे शेख सिध्दीक यांना उपचारासाठी तात्काळ परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नसीर यांना प्राथमिक उपचारा नंतर घरी पाठवण्यात आले दरम्यान या स्फोटाची तिव्रता इतकी भयंकर होती की आसपासचा परिसर अक्षरशः हादरून गेला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या