💥पुर्णेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी केला कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा तिव्र निषेध....!


💥शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली जाळण्यात आला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा💥

पूर्णा (दि.१९ डिसेंबर) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटक राज्यात समाजकंटकांनी विटंबना केली सदरील प्रकरणा नंतर कर्नाटक राज्याचे तथाकथित हिंदुत्ववादाचा बुरखा पांघरले भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठत प्रसार माध्यमांना वादग्रस्त प्रतिक्रिया देत अकलेचे तारे तोडले छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचे बालिशपणाचे विधान मुख्यमंत्री बोम्मई यांनी केल्यानं तमाम शिवप्रेमी जनतेच्या मनाला ठेस पोहचवली.यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली पूर्णेतील  छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज रविवार दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळच्या सुमारास कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून घटनेचा तिव्र निषेध व्यक्त केला आहे.


कर्नाटक राज्यातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडताच सर्वत्र शिवप्रेमी जनतेतून रोष व्यक्त केला जात असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य करत छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं म्हणुन शिवप्रेमी जनतेची मने दुखावली दुखावल्या पूर्णा शहरात रविवार दि.१९ डिसेंबर रोजीया घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याचे पहावयास मिळाले.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत पुतळा आणुन त्यास जोडे मारले.पुतळा जाळून त्याचा निषेध व्यक्त केला.


यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे,शहर प्रमुख मुंजा कदम,नगरसेवक श्यामराव कदम व नगरसेवक तथा विधिज्ञ राजेश भालेराव,युवासेना तालुका प्रमुख बंडूआप्पा बनसोडे,युवा सेना शहर प्रमुख विकास वैजवाडे, सचिन (पप्पू)कदम, अंकित कदम, गोपाळ कदम,गजानन आगलावे, आदीं शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा दुग्धाभिषेक करत शिवगर्जना करीत परिसर दणाणून सोडला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या