💥हैदराबाद-औरंगाबाद स्पेशल पैसेजरचा धक्का लागल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू....!


💥औरंगाबाद ते मुकुंदवाडी रेल्वे स्थानका दरम्यान उस्मानपुरा रेल्वे गेट जवळील घटना💥

औरंगाबाद (दि.०९ डिसेंबर) - हैदराबाद-औरंगाबाद स्पेशल पैसेजरचा औरंगाबाद ते मुकुंदवाडी रेल्वे स्थानका दरम्यान उस्मानपुरा रेल्वे गेटच्या जवळ जोरदार धक्का लागल्याने एक अनोळखी इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरूवार दि.०९ डिसेंबर २०२१ रोजी घडली सदरील जख्मी इसमास तात्काळ उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचार सुरू असतानाच तो इसम मयत झाला आहे.

यांच्या नातेवाईक किंवा मित्र परिवार यास कोणी ओळखत असल्यास तातडीने रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांना 9158888159 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे प्रवासी सेनेकडून करण्यात आले आहे.....

💥प्रवासी रेल्वे सेनेला मयताची ओळख पटवण्यात अखेर यह....!रेल्वे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यात प्रवासी रेल्वे सेनेला अखेर यश आले असून मयत हा मुकबधीर असून संबंधीत मयताच्या जवळ आढळलेल्या आधार कार्डावरून त्याचे नाव नवनाथ जनार्धन केदार राहणार देवलाई परिसर औरंगाबाद येथील असल्याचे उघड झाले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या