💥मंगरूळपीर येथे विनाहेल्मेट वाहन धारकांवर कारवाई....!


💥वाशिमचे पोलिस अधिक्षक श्री.बच्चनसिंग यांच्या आदेशाने करण्यात आहे कारवाई💥

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर येथे पोलिसविभागाकडून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करणे सुरु असुन वाहनधारकांना हेल्मेटचे महत्व वेळोवेळी विविध ऊपक्रमाच्या माध्यमातुन पोलिसांकडुन पटवुन देन्यात येत आहे.तरीही काही वाहनधारक विनाहेल्मेट प्रवास करुन स्वतःचा आणी इतरांचा जिव धोक्यात घालतात अशा वाहनधारकांवर मंगरुळपीर पोलिसांकडून वेळोवेळी कायदेशिर कारवाई केल्या जात आहे.वाशिमचे पोलिस अधिक्षक श्री.बच्चनसिंग यांच्या आदेशाने तसेच ऊपविभागिय पोलिस अधिकारी श्री.यशवंत केडके यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या नेतृत्वात ही विनाहेल्मेट वाहनधारकांवरच्या कारवाईची मोहिम राबवल्या जात आहे.

दिवसेंदिवस अपघात होत आहे.या अपघातात हेल्मेटअभावीच बरेच जण मृत्युमुखी पडल्याचे समजते.या  बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून वाशिम पोलिस दलाकडून विनाहेल्मेट वाहनधारकांवर कायदेशिर कारवाईचा बडगा ऊगारणे सुरु केले आहे.यासंदर्भात मोहिम राबवून विनाहेल्मेट वाहनधारकांवर कारवाई करुन कायदेशिर दंड आकारला जात आहे.लोकांना विविध ऊपक्रमाच्या माध्यमातुन हेल्मेटचे महत्व पटवुन देण्यात येत असुन कायद्याचे पालन करण्याच्या सुचना देण्यात येत आहेत.पोलीसांकडुन करण्यात येत असलेल्या जनजागृतीबद्दल नागरीकही सजग झाले असुन कायदेशीररित्या नियम पालन करीत असल्याचे चिञ आहे.विनाहेल्मेट वाहनधारकांवर कारवाई ही ठाणेदार यांच्या नेतृत्वात हेड काॅन्सटेबल जाधव,नाईक काॅन्सटेबल सुनिल गंडाईत,नाईक काॅन्सटेबल शिंदे,पिसी.अनिल हमाने आदींच्या पथकांनी केली आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या