💥परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा तिव्र निषेध....!


💥यावेळी मा.महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीराजे यांचा दुग्धभिषेक करून अभिवादन करण्यात आले💥 

परभणी (दि.१९ डिसेंबर) :- संबंध देशाचे आराध्यदैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्नाटक राज्यातील बैगलोर येथील सदशिव नगर भागातील पुतळा विटंबना केल्याच्या निषेधार्थ परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध  करण्यात आला.

काही संकुचित वृती असणाऱ्या विकृत समाजकंटकांनी ही विटंबना करून सबंध देशातील शिवप्रेमी च्या भावना या मुळे दुखावल्या आहेत.छ्त्रपती शिवाजी महाराज हे राजकारणातील विषय नाहीत तर सर्व शिवप्रेमींनी चा अस्मितेचा विषय आहेत. त्यामुळे या घटनेमुळे सर्व शिवप्रेमींनी ची अस्मिता दुखावली आहे.त्यामुळे त्या सर्व विकृत आरोपींवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोह चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्नाटक सरकार चा निषेध व घोषणाबाजी करून करण्यात आली.

यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीराजे चा दुग्धभिषेक करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. मनपा गट नेते  जाकीर लाला, विकास लंगोटे, प्रा.रामेश्वर अवरगंड, शंकर भागवत, अमोल पथरीकर, विश्वजीत वाघमारे, अनिल कानडे, अस्लम चोधरी, अनिल पुरी, गोपिनाथ थोरात, अजय देशमुख,  शमसू हसमी,  संभाजी ब्रिगेड चे नितीन देशमुख,मंगेश भरकड गणेश थोरात, अजय पाते, सुनील जाधव* आदी पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या