💥ओबीसी आरक्षण ; अखंड आंदोलनाची मशाल गंगाखेडात पेटली....!


🔹ईंपॅरीकल डाटासाठी तहसील समोर आंदोलन सुरू 🔹

गंगाखेड : सर्वोच्च न्यायालयास ओबीसींचा ईंपॅरीकल डाटा त्वरीत सादर करावा, या मागणीसाठीच्या अखंड धरने आंदोलनास आज गंगाखेडात सुरूवात झाली. कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मराठवाड्यातून आलेल्या विविध ओबीसी नेत्यांनी आपला पाठिंबा दर्शवत हे आंदोलन राज्य व देशभर पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. 


दोन्ही सरकारांनी टोलवाटोलवी करू नये. राज्याने एक तर हा डाटा केंद्र सरकारकडून ऊपलब्ध करून घ्यावा अथवा राज्य आयोगास आवश्यक ती सर्व शक्ती प्रदान करावी. या आयोगामार्फत एक महिण्याच्या आत हा ईम्पॅरीकल डाटा जमा करून तो न्यायालयात सादर करावा. हे होत नाही तोपर्यंत हे अखंड धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार याप्रसंगी बोलताना नेत्यांनी व्यक्त केला. 

जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, लक्ष्मण बुधवंत, आनंद बनसोडे, मनसे किसान प्रदेश ऊपाध्यक्ष बालाजी मुंडे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, धनगर साम्राज्य सेनेचे अध्यक्ष सखाराम बोबडे, सुरेश बंडगर, गोविंद लटपटे, ब्राह्मण महासंघाचे बाळासाहेब राखे, मनोहर महाराज केंद्रे, साधनाताई राठोड, लक्ष्मण बुधवंत, आनंद बनसोडे, राम भोळे, राहुल फड आदींनी मनोगत व्यक्त केले. विविध पक्षीय नेते, लोकप्रतिनिधींनी आंदोलन स्थळी भेट देत आपला पाठींबा दर्शवीला. 

अखंड धरने आंदोलनासाठी तहसील समोर कायमस्वरूपी मंच ऊभारण्यात आला असून विविध गावांमधील ओबीसी बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात येत आहे. आज झालेल्या आंदोलनात गंगाखेड तालुक्यातील ग्रामिण भागातून बहुसंख्य ओबीसी बांधव सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या