💥पुर्णा नगर परिषद निवडणूक ; सत्ता प्राप्तीसाठी शहर विकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होईल का ?


💥प्रस्थापितांच्या वर्चस्वाच्या लढाईत नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारेंचे राजकीय भविष्य धोक्यात येण्याची शक्यता💥

✍️ राजकीय वार्तापत्र - चौधरी दिनेश (रणजीत)

पुर्णा ; नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय डाव पेचांना सुरूवात झाली असून येणाऱ्या नगर परिषद निवडणूकीत पुन्हा सत्ता प्राप्तीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या प्रस्थापितांनी 'साम दाम दंड भेदाचे' अस्त्र पुन्हा पाजळायला सुरूवात केली असून नगराध्यक्षपद एस सी/एस टी/ओपण कोणालाही सुटले तरी 'दाम करी काम' नितीचा अवलंब करीत कृषी क्षेत्रा प्रमाणेच राजकीय क्षेत्रात सालगड्याचा प्रयोग यशस्वी करून सत्तेची सुत्र आपल्याच भ्रष्टाचाराने बरबटलेल्या हातात राहावी या दृष्टीकोनातून रणनिती आखल्या जात असून यावेळी ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणल्यामुळे 'शिक्याच तुटल अन् बोक्याच साधल' असा सुवर्णयोग प्रस्थापित राजकीय बोक्यांना प्राप्त झाल्याने आता दोन माकडांच्या भांडणात बोक्याला अलगद मेव्यावर ताव मारता येणार असल्याने राजकीय बोक्यांची सर्वत्र बल्ले बल्ले झाल्याचे पाहावयास मिळत असून निवडणूक काळात सर्वसामान्य मतदार जनतेला दाखवण्यासाठी एकमेकांच्या विरोधात धुराळा उडवणारे प्रस्थापित निवडणूकी नंतर मात्र एकमेकांना अक्षरशः अलिंगण घालतांना व एकाच ताटात विकासनिधीचा फडशा पाडतांना दिसले नाही तर नवलच म्हणावे लागेल.


 मागील सन २०१६ यावर्षी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणूकीत शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवून जनमतातून नगराध्यक्ष पदावर निवडून आलेल्या विद्यमान नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे व त्यांचे प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक संतोष एकलारे यांनी निवडून आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन शहराच्या विकासाचा आराखडा तयार करीत अनेक महत्वाची विकासकामे केली निवडणूक काळात पक्षाच्या वचनणाम्यात दिलेल्या प्रत्येक  वचनांची पुर्ती करीत असतांना आलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करीत कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीतून शहराचा बऱ्या पैकी विकास घडवून आणला नगराध्यक्ष एकलारे यांनी केलेल्या विकासकामांमुळे जनसामान्यांमध्ये नगराध्यक्षांसह त्यांचे प्रतिनिधी संतोष एकलारे यांची प्रतिमा उंचावली असे म्हणण्यास हरकत नाही त्यांच्या कारकीर्दीत शहरातील छत्रपती संभाजी राजे चौक परिसरातील जुन्या चमनच्या जागेवर नव्याने उभारण्यात आलेले छत्रपती संभाजी राजे व्यापारी संकुल,नगर परिसदेची नव्याने उभारण्यात आलेली भव्य अद्यावत प्रशासकीय इमारत,शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात उभारण्यात आलेला भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुर्णाकती पुतळा शहराला जोडणाऱ्या मुख्य मार्गाचे डांबरीकरण अशी अनेक ऐतिहासिक विकासकामांसह विद्यमान नगराध्यक्षा एकलारे व त्यांचे प्रतिनिधी संतोष एकलारे यांच्या कर्तृत्वाची पुर्णेच्या इतिहासात नोंद होईल यात तिळमात्र शंका नाही.

पुर्णेच्या पुर्व इतिहासात अश्या पध्दतीने कोणत्याही नगराध्यक्षाने यापुर्वी विकासकामे केली नाहीत आणि यानंतर सुध्दा कोणताही नगराध्यक्ष करू शकणार नाही त्यामुळे विद्यमान नगराध्यक्षांसह त्यांचे प्रतिनिधी संतोष एकलारे यांची जनमानसात उंचावलेली प्रतिमा आता प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपत असल्याचे निदर्शनास येत असून येणाऱ्या नगर परिषद निवडणूकीत प्रस्थापितांकडून त्यांचे राजकीय भविष्य संपवण्याच्या उद्देशाने कुटील कारस्थान रचण्याची शक्यता नाकारता येत नाही विद्यमान नगराध्यक्षा एकलारे यांचे प्रतिनिधी संतोष एकलारे यांनी केलेल्या शहरातील विकासकामांची पोच पावती सर्वसामान्य मतदार जनता त्यांना देईलच परंतु पक्षानेही त्यांना सन्मानाने त्यांच्या एच्छीक प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास याही निवडणूकीत शिवसेनेला नगर परिषदेत सत्ता स्थापण करण्यास कोणतीही ताकत रोखू शकणार नाही असे शहरवासीयांतून बोलले जात आहे.

नगर परिषद निवडणूकी पुर्वी शहर विकास आघाडी स्थापणेच्या दिशेनेही हालचालींना वेग आला असून या शहर विकास आघाडी मध्ये जुन्याच नगरसेवकांना संधी दिली जाते की नवीन चेहऱ्यांचा समावेश केला जातो याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले असून विद्यमान नगरसेवकांतील अनेक नगरसेवकांच्या विरोधात विकास कामांच्या मुद्द्यावरून जनमत गेल्यामुळे शहर विकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतो की अयसस्वी याचे उत्तर तर शहर विकास आघाडीकडून उमेदावारांची घोषणा झाल्यानंतरच मिळेल विद्यमान नगराध्यक्षा एकलारे व त्यांचे प्रतिनिधी संतोष एकलारे यांनी शहरात केलेली अत्यंत महत्वाची विकासकामे त्यांच्या यशाची पुढील पायरी जरी असली तरी शहरातील अनेक प्रभागात झालेली निकृष्ट दर्जाची कोट्यावधी रुपयांची विकासकामे संबंधित प्रभागातील भ्रष्ट नगरसेवकांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शंभर टक्के अपयशाची पायरी ठरू शकते असे स्पष्ट मत राजकीय जानकारांतून व्यक्त होत असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकी पुर्वी ओबीसी आरक्षणावर ठोस निर्णय झाला नाही तर याचे दुष्परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत प्रत्येक राजकीय पक्षांना भोगावे लागणार आहेत....

टिप ; सदरील राजकीय वार्तापत्राची कॉफी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या