💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि.२० डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन.....!


💥समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना💥

परभणी (दि.१६ डिसेंबर) :- जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तर तालुकास्तरावर दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी आयोजित केला जात असतो. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि.२० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजता जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा तसेच समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. तरी जिल्ह्यातील महिलांनी त्यांच्या वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी विहीत नमुन्यात परभणी येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात दाखल कराव्यात. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी के.व्ही. तिडके यांनी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या