💥परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे दोन वनराई बंधाऱ्यांची ऊभारणी....!


💥ओढे नाल्यांच्या मार्फत वाहणाऱे पाणी अडवून जमिनीतील पाणी साठ्यात वाढ करण्याच्या प्रयत्न💥

✍️किरण घुंबरे पाटील

पाथरी:-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या संकल्पनेतून तालुक्यात नऊशे वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट असून यापैकी मौजे वाघाळा येथे लोकसहभागातून दोन वनराई बंधारे उभारण्यात आले.मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसा मुळे ओढे नाले यांच्या मार्फत वाहणाऱे पाणी अडवून जमिनीतील पाणी साठ्यात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून वनराई बंधाऱे बांधण्याचे काम सुरु झाले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार व कृषी विकास अधिकारी हनुमंत मांगले गट विकास अधिकारी सुहास कोरेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले. त्याअंतर्गत मौजे वाघाळा येथे जिल्हा परिषद प्रशाला शाळेचे विद्यार्थी व शिक्षक आणि सरपंच बंटी पाटील यांच्या मदतीने वाघाळा-फुलारवाडी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात पाणी वाहुन जाते याच ठिकाणी लोकसहभागातून दोन वनराई बंधारे उभारण्यात आले.

यामध्ये गावाचे सरपंच श्री भागवत उर्फ बंटी पाटील,उपसरपंच शंकर नाना सोळंके,पंचायत समितीच्या कृषी अधिकारी कुपटेकर एस. व्हि., विस्तार अधिकारी सय्यद व मैत्रेवार, प्रशालेचे शिक्षक श्री स्वामी,सचिन वाघ,सुशिल घुंबरे, जन्मभूमी फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे,तसेच गावकरी यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या