💥साई बाबांचे अवतार श्री दत्त साई बाबा बुधवारी अंबाजोगाईत येणार....!


💥भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा💥

अंबाजोगाई (प्रतिनिधी) श्री साई बाबा (शिर्डी) यांचे अवतार श्री दत्त साई बाबा यांचे अंबाजोगाई शहरातील संत भगवान बाबा मंदिर नागझरी परीसर येथे बुधवार,दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी आगमन होत आहे.तरी सर्व श्री दत्त साई बाबा भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त साई बाबा भक्त परीवार,अंबाजोगाई यांनी केले आहे.

बुधवार,दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता परळी येथून अंबाजोगाईत आगमन झाल्यानंतर श्री.दत्त साई बाबा हे  अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील श्री.दत्त मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत.त्यानंतर अंबाजोगाईतील श्री.योगेश्‍वरी देवी मंदिरात दर्शनास येतील.,आद्यकवी मुकुंदराज स्वामी मंदिरात समाधीचे दर्शन करतील.त्यानंतर मंगळवार पेठ येथील श्री.गणेश साईबाबा मंदिरातील भक्तांना दर्शन व आशिर्वाद देतील.श्री साई बाबांचे अवतार श्री दत्त साई बाबा हे भक्त गणेश जाधव आणि भक्त राजेभाऊ गुट्टे यांच्या निवासस्थानी दर्शन देणार आहेत.या ठिकाणी श्री दत्त साई बाबा यांची पाद्यपुजा असे कार्यक्रम होणार आहेत.संत भगवान बाबा मंदिर नागझरी परिसर येथे श्री.दत्त साई बाबा हे दुपारी १२ ते ३ पर्यंत भाविक भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध असतील.या प्रसंगी गायक सुभाष शेप व संच हे भक्तीगीते सादर करतील.या ठिकाणी दर्शनास उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप ही करण्यात येणार आहे.तरी अंबाजोगाई शहर व परिसरातील श्री.दत्त साई बाबा यांच्या भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते साईभक्त संजयभाऊ गंभीरे,संजय सुर्यवंशी,गणेश जाधव,राजेश भिसे, राजेश दरेकर,राजेश गुट्टे,कैलास जाधव, प्रविण भिसे,रवि लाड,सचिन भिसे, नारायण महाराज लखेरा,शंकर वाकडे,परळी येथील पुजारी औटी काका आणि कुलकर्णी काका यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या