💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथे कै.गंगाधर दादा पवार यांच्या स्मृती दिना निमीत्य मोफत आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न...!


💥सेंद्रीय खताचा वापर करुन ऊत्पादन केलेले धान्य खाल्ले तर आरोग्य ऊत्तम व दीर्घायुष्य मिळेल - डॉ.दिपालीताई काकडे

ताडकळस , माखणी ता.05 

 पुर्णा ; शेतीतून काळानुसार ऊत्पादन कोनत्या पिकाचे घ्यायचे व सेंद्रीय खताचा वापर करुन ऊत्पादन केलेले धान्य खाल्ले तर आरोग्य ऊत्तम व दीर्घायुष्य मिळेल याच विच्यारांचे हजारो शेतकरी परभणी जिल्ह्यात कै गंगाधरदादा पवार यानी निर्माण केले असे प्रतिपादन आर्युवेद डॉ.दिपालीताई काकडे यांनी केले . तसेच महिलाचे आरोग्य ह्या विषयावर मार्गदर्शन केले तर पुनमताई मोरे यांनी दादा पवार यांचे आनुभव सागीतले.


पुर्णा तालुक्यातील माखणी येथे कै.गंगाधर दादा पवार यांच्या स्मृती दिनानिमीत्य प्रभावती ग्रुप व ओंकार गृहउद्योग यांच्या सयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व रक्तदान  शिबीर  रविवार (ता. 05) ठेवण्यात आला होता . कार्यक्रमासाठी रमेश पवार , प्रभावती ग्रुप च्या अध्यक्षा सौ पूनम मोरे, गोविंद आवरगंड प्रल्हाद पवार , स्री रोगतद्न्य डॉ.जयश्री पवार ,बालरोग तद्न्य सौ. योजना पालवे , डॉ.सौ. सोनिया देवसरकर ,डॉ.राधिका सोळ्ंके,पुरुषोत्तम पवार अदीची प्रमुख उपस्थिती होती.

        कार्यक्रमात उस तोड कामगार व गावातील महीला पुरुष 210 रुग्णाची तपासणी करण्यात आले . ऊस तोड मजुरातील  गरोदर महीलाना औषधी उपचार करण्यात आले .10 रुग्नाना परभणी येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले . संजीवनी प्रतीस्थान संचलीत हुजूर साहेब रक्त पेढीचे डॉ ओंकार श्रीसागर यानी रक्तदान शिबीराचे काम पाहीले. अनेकानी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणिक आवरगंड, सतिश आवरगंड , लक्ष्मण आवरगंड ,परसराम यानी केले. पुरी , भागवत आवरगंड , मोतीराम  आवरगंड, गजानन पवार ,चांदाजी आवरगंड , हनुमान आवरगंड ,राजकुमार ढगे ,विनायक आवरगंड वदंना काबळे आशा शेविका अदीनी प्रयत्न केले

 .यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण गाढे यांनी केले. सुत्रसंचालन मुख्याध्यापक संजय जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक उपक्रमसील शेतकरी जनार्धन आवरगंड यानी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या