💥गंगाखेडच्या गोदापात्रात ओबींसींचे जलसमाधी आंदोलन.....!


🔹ईंपॅरीकल डाटासाठी एल्गार परिषद आक्रमक 🔹

गंगाखेड : ईंपॅरीकल डाटा लवकरात लवकर तयार करून द्यावा, या मागणीसाठीची आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याच मागणीसाठी ओबीसी एल्गार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट भरलेल्या गोदापात्रात आंदोलन केले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


ईंपॅरीकल डाटाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. आज सकाळपासूनच  आरक्षण बचाओ कृती समितीचे पदाधिकारी गोदाकाठावर जमले होते. पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावलेला असतानाही आंदोलकांनी गोदापात्रात झेप घेतली.  बालाजी मुंडे, गोविंद यादव, गोविॅद लटपटे, सखाराम बोबडे, आदिनाथ मुंडे, सदाशिव कुंडगीर, मधुसूदन लटपटे आदिंनी गोदापात्रातच जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र व राज्य सरकारने आवश्यक त्या बाबींची पुर्तता करून डाटा तात्काळ सादर करावा अन्यथा भविष्यात हा लढा अधिक तीव्र करण्याचा ईशारा यावेळी बोलताना आंदोलकांनी दिला. 


आंदोलनस्थळी कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बाहेरगावहून आलेल्या व शहरातील नागरिकांचे या आंदोलनाने चांगलेच लक्ष वेधून घेतले. शहरातही दिवसभर या आगळ्या आंदोलनाची जोरदार चर्चा होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या