💥भाजपा युवा मोर्चाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रकांत देवकते यांची निवड...!


💥भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र💥 

परळी वैजनाथ (दि.३१ डिसेंबर) - तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेले धडाडीचे कार्यकर्ते चंद्रकांत देवकते यांची भाजपा युवा मोर्चाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी नियुक्ती पत्र देऊन देवकते यांचा सत्कार केला. या निवडीबद्दल देवकते यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

        वडखेलचे माजी सरपंच म्हणून देवकते यांनी उत्कृष्ट काम केले आहे. भाजपमध्येही गेल्या अनेक वर्षापासून ते सक्रीय आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचा शहरी आणि ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे चंद्रकांत देवकते यांच्या निवडीबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

      दरम्यान आपण पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असुन त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे प्रतिपादन चंद्रकांत देवकते यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या