💥पुर्णेत भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन...!


💥भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे विद्वान होते त्यांचे विचार जगाने स्विकारले - प्रा.डॉ.ह.नि.सोनकांबळे

पूर्णा (दि.०६ डिसेंबर) - महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे विद्वान होते त्यांचे विचार जगाने स्विकारले बुद्ध कबिर फुले यांना गुरु मानून त्याचे विचार त्यांनी स्विकारले भारतीय संविधानाच्या माध्यमातून वंचितांना न्याय दिला त्यांचे विचार चळवळीला कार्यकर्त्यांनी स्विकारून चळवळ गतिमान केली पाहिजे असे प्रतिपादन प्रा.डॉ.ह.नि.सोनकांबळे यांनी केले.


पूर्णा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमिताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मोहन मोरे प्रमुख मार्गदर्शक भन्ते पंयावंश,भन्ते संघरत्न प्रमुख उपस्थिती मध्ये रिपाइचे जेष्ठ नेते प्रकाश काबळे नगरसेवक उत्तम खंदारे ॲड.धम्मदिप जोंधळे ॲड.हर्षवर्धन गायकवाड दादाराव पंडित महेबूब कुरेशी प्रा.अशोक कांबळे,आशोक व्ही कांबळे आदी उपस्थित होते या निमिताने सकाळी ९:३० वाजता डॉ. आंबेडकर चौक येथे निळा ध्वज अर्धा वरती उतरण्यात आला अभिवादन करण्यात आले त्या नंतर बुद्ध विहार येथे धम्म ध्वजारोहन करून अर्ध्या वरती उतरण्यात आला बुद्ध वंदना त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले यावेळी भन्ते पंयावश यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षिय समारोप व श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यकमाचे सुगसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले यावेळी डॉ. आंबेडकर चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.बी.आर आंबेडकर व बुद्ध विहार समिती भारतीच बौद्ध महासभा महिला मंडळाच्या पदाधिकारी यांनी प्रयत केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या