💥लेडी सिंघम ठाणेदार नैना पोहेकर यांची धाडसी कामगिरी....!


💥अनसिंग येथे चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी केले जेरबंद💥

वाशिम:-काही दिवसापुर्वी वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील ज्वेलर्सवर चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी अखेर पोलीसांनी नांदेड येथुन जेरबंद केल्याची माहीती मिळाली असुन सदर धमाकेदार कारवाई मा.पोलिस अधिक्षक यांच्या आदेशाने व ऊपविभागिय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात लेडी सिंघम अनसिंगच्या ठाणेदार नैना पोहेकर आणी त्यांच्या पोलिस टीमने केली आहे.

      वाशिम जिल्ह्यात चोरींचे सञ सुरु असुन काही दिवसापुर्वी असाच चोरीचा प्रयत्न अनसिंग येथील ज्वेलर्सवर झाला होता परंतु सतर्क नागरीक आणी पोलीस गस्तीमुळे हा चोरीचा प्रयत्न फसला होता.सदर चोरटे सिसिटिव्हीत कैद झाले होते परंतु ते पसार झाल्याने त्यांना शोधने हे पोलींसांपुढे मोठे आव्हान होते.या घटनेची वाशिमचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक श्री.बच्चनसिंग यांनी गांभीर्याने दखल घेवुन चोरटे शोधन्याचे आदेश देत पोलीसांना याविषयी मार्गदर्शन केले.ऊपविभागीय पोलिस अधिकारी श्री.यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात आणी ठाणेदार नैना पोहेकर यांच्या नेतृत्वात पथक नेमून तपासचक्र फिरवले.मिळालेल्या माहितीनूसार सदर प्रकरणातील संशयित नांदेडला असल्याचे समजताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने विवेक किसन दामोदर वय-२२,कपील ज्ञानेश्वर मारकड वय-२२ दोन्हीही रा.बेलोरा ता.पुसद जि.यवतमाळ,अंकुश हनुमान हाके वय-३० रा.धानोरा ता.पुसद जि.यवतमाळ,अजय वाघु जाधव वय-२४ रा.शेनद ता.महागाव जि.यवतमाळ या चौघांना जेरबंद करून वाशिम कोर्टात हजर केले.या प्रकरणात काही महीलासह अजुनही साथीदार असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली.कोर्टाने सदर आरोपिना तिन दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याचे समजते.सदर कारवाई एस पी साहेब,एसडिपिओ,स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात अनसिंग पोलीसांनी केली.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या