💥शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा शंभू सेनेचे निवेदन...!


💥जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाच्या भूसंपादनाचे काम सध्या चालू💥

पूर्णा (दि.१५ डिसेंबर) - नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाच्या भूसंपादनाचे काम सध्या चालू आहे दळणवळणाच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत चांगला आहे परंतु शेतकर्‍यांच्या जमिनीचा मोबदला योग्य मिळावा तो दहापट असावा जेणेकरून आज आमच्या शेतात फळबागा विहिरी आहेत जमिनी पूर्ण ओलिताखाली आहे या दृष्टीने विचार करून आमच्या जमिनीचा मोबदला द्यावा अन्यथा शंभू सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन पूर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर यांना देण्यात आली या निवेदनावर शंभू सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष बोबडे पूर्णा तालुका अध्यक्ष ओमकार बोबडे सौरभ शिंदे सुरज लिंगायत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या