💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न...!


💥आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ व लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड यांच्या वतीने आयोजन💥


पुर्णा (दि.०८ डिसेंबर) - तालुक्यातील धानोरा काळे 
 येथे दि.7 डिसेंबर,मंगळवार रोजी स्व.बापूराव गंगाराम काळे(साधू) यांचे स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिबिरामध्ये 288 रुग्णांची तपासणी झाली त्यापैकी 73 रुग्ण मोतीबिंदूशस्त्रक्रियेसाठी निवडले गेले. त्यापैकी जवळपास चाळीस रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. यावेळी आयोजक आ.रत्नाकर गुट्टे  मित्र मंडळाचे तालुका उपाध्यक्ष तथा उपसरपंच कैलास काळे यांनी प्रास्ताविकात स्व.बापूराव काळे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी त्यांच्या सरपंच कार्यकाळात दूरदृष्टी ठेवून विकासकामांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज प्राथमिक आरोग्य केंद्र,गोदावरी नदीवरील पुल मंजूर करून तीन जिल्ह्याला जोडन्याचे काम केले.अशा विवध आठवणी सांगत याच विचाराने गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे कैलास काळे यांनी यावेळी सांगितले.

         या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आ. डॉ.रत्नाकर गुट्टे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सरपंच तथा मा.उपसभापती सोपानराव काळे(काका)होते. प्रमुख उपस्थिती राजेभाऊ फड, संदीप आळनुरे, कृष्णाजी सोळंके, राजेश फड, माधवराव गायकवाड, गणेश कदम, हनुमंत मुंडे, जगन्नाथ रेनगडे, गणेशराव गाढवे, बापूराव डुकरे, नारायण तात्या दुधाटे,  सुदामराव वाघमारे, बंडू पवार, नवनाथ भुसारे, लक्ष्मण मस्के, दीनानाथ दुधाटे, कैलास शिंदे, निवृत्ती दुधाटे, व्यंकटेश पवार, मारोती मोहिते, नारायण मोरे, गजानन शिंदे,  शेषेराव शिनगारे, सुदाम ढोले, प्रल्हाद कोळेकर, सुभासराव सुर्यवंशी, विजय पौळ, माटे सर, रंगनाथ शिंदे, शेख इस्माईल उपस्थीत होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप चे प्रताप काळे यांनी केले तर कार्मक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी आवरगंड, भगवान काळे, उद्धव शिंदे, दत्तराव पौळ, रमेशराव काळे, अंगद काळे,भुजंग काळे,सुरेश काळे, विश्वनाथ काळे,गोविंद आणा काळे, (भंबर) काळे यांनी मेहनत घेतली यावेळी गावातील व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या