💥पुर्णेतील युवा सामाजिक कार्यकर्ते सुमित चावरे यांची युवासेना शहर चिटणीस पदावर निवड....!


💥सुमित चावरे यांच्या या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे💥

पुर्णा (दि.३० डिसेंबर) - येथील तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते सुमित नंदलालजी चावरे यांची नुकतीच पुर्णा शहर युवासेनेच्या शहर चिटणीस (सचिव) पदावर मातोश्री मुंबई येथून नियुक्ती करण्यात आली आहे. 

पुर्णा शहर युवासेना चिटणीस पदावर सुमित चावरे यांच्या या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम,युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले,युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी,शिवसेना पुर्णा शहरप्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम, युवासेना शहरप्रमुख विकास वैजवाडे यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या