💥पेन्शनच्या नावाने छळ ; नांदेडच्या चार जेष्ठ पत्रकाराचा बेमुदत आमरण उपोषणाचा संकल्प...!


💥सरकारने काढलेल्या शर्ती,अटी पुर्ण करून देखील पुन्हा पुन्हा त्रुटी सादर करा या एकाच आक्षेपाने पत्रकारांना बेजार केले जातय💥

नांदेड : त्रुटी पुर्ण करा या एकाच आक्षेपाने पत्रकारांना हवालदिल करणाऱ्या बिनबुडाच्या आक्षेपाने संतप्त झालेल्या पत्रकाराने शेवटी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे ‌.त्रुटी नेमकी काय आहे हे विचारले असता दोन वर्षांत सरकारने स्पष्ट केलेले नाही म्हणून हा पत्रकारांवर मानसिक बलात्कार असल्याची भावना खदखदत आहे .सरकारच्या विरोधात धोंडोपंत विष्णुपुरीकर वय ७२ ,मोहम्मद अब्दुल सत्तार वय ६७ माधव संताजी अटकोरे वय ७२ ,सौ.अनुराधा धोंडोपंत विष्णुपुरीकर हे दि.२० डिसेंबर २०२१ पासून जिल्हा माहिती कार्यालय नांदेड समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत .याविषयी काल दिलेल्या निवेदनात पत्रकारांनी म्हटले आहे की दोन वर्षांपूर्वी सरकारने सुरू केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत ज्या पत्रकाराचे वय ६० पेक्षा जास्त असेल ज्याने सलग किमान ३० वर्षे पत्रकारितेत सेवा केली असेल त्यांच्यावर गुन्हेगारीची नोंद नसेल ज्याचा उदरनिर्वाह केवळ पत्रकारिताच असेल अशाच पत्रकारांना दरमहा १७ हजार पेन्शन दिले जाईल .या सरकारने काढलेल्या शर्ती ,अटी पुर्ण करून देखील  पुन्हा पुन्हा त्रुटी सादर करा या एकाच आक्षेपाने पत्रकारांना बेजार केले जात आहे. नांदेडच्या वरील चार पत्रकाराने सरकारच्या सर्व अटीशर्ती पुर्ण करून सुद्धा त्यांना पेन्शन पासुन वंचित ठेवणे हा मानसिक बलात्कार आहे अशी भावना पत्रकारात आहे. पेन्शन योजनेचे गोंडस नाव सन्मान योजना असे ठेवुन पत्रकारांना नुसते भुलविले जात आहे. सरकारच्या या जुलमाविरूध्द जळगावच्या चार पत्रकारांनी तर थेट मरणाचीच परवानगी सरकारकडे मागितली होती तरीही सरकारने दखल घेतली नाही .पत्रकार जीवंत असेपर्यंतच हे पेन्शन मिळणार आहे .३० ते ४० वर्षे सतत लोकांच्या समस्या वृतपत्रात मांडणारे पत्रकार मात्र दुर्दैवाने दुर्लक्षित आहेत उलट आमदार , खासदार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला पेन्शन देण्याचा सपाटा सरकारने मंजूर केला , पत्रकारांना मात्र जीवंतपणी मरणयातना मिळत आहेत हा अन्यायच नाही काय ? पेन्शनसाठी सरकारने दर तीन महिन्याला मिटीग होईल व पात्र पत्रकारांचे प्रश्न निकाली काढण्यात येतील असे सांगितले होते मात्र सहा महिन्यांत मिटीग होऊन सुद्धा सरकारचा एकच आज्ञ

आक्षैप त्रुटी दुर करा हाच आहे यामुळे नांदेडचे पत्रकार बेजार झाले आहेत .आणि शेवटी बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे  पत्रकारानी काल दिलेल्या निवेदनात सर्व आमदार,खासदार वरीष्ठ अधिकारी यांना निवेदनाच्या प्रती पाठविल्यास आहेत....!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या