💥परभणी जिल्ह्यातून पुणे येथील कृषी धोरण निस्चितीसाठी आयोजित चर्चा सत्रास तिन महिला शेतकऱ्यांचा सहभाग...!


💥पूर्णा तालुक्याती माखणीतील मिरा जनार्धन आवरगंड यांचा सहभाग💥

परभणी (दि.२१ डिसेंबर) - परभणी जिल्ह्यातून तीन महीला शेतकरी पुणे येथिल 2022  कृषी धोरण निस्चितीसाठी चर्चा सत्रास सहभाग यात पुर्णा तालुक्याती माखणी येथिल मिरा जनार्धन आवरगंड परभणी तालुक्यातील असोला येथिल सुकेषनी चौधरी परभणी कृषी विभागाच्या आधिकारी स्वाती राजेंद्र घोडके यान्चा सहभाग पुणे येथिल पद्मश्री सभागृह कृषी आयुक्तालय पुणे, येथे माननीय. मंत्री कृषी महोदयांच्या अध्यक्षतेखाली महिला चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन सोमवार (ता .20) करण्यात आले होते. 


या कार्यक्रमाकरिता प्रत्येक विभागातून 12 महिला आणि एक संपर्क अधिकारी तसेच जिल्ह्यातून दोन महिला पुणे येथे पाठवल्या होत्या कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चासत्रांमध्ये प्रभावी संवाद साधू शकणार या महिलांची निवड केली होती या चर्चासत्रामध्ये महिलांचा कृषी क्षेत्रामध्ये सहभाग वाढवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील आणि जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग किंवा मार्केटिंग ज्ञान तसेच 2022 हे वर्ष "महिला किसान वर्ष" म्हणून साजरा करायचे आहे त्यासाठी महिलांचा सहभाग शेतीमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे महिलांना येणाऱ्या अडचणी या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा माननीय कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्यासोबत सर्व विभागातील महिलांनी केली परभणी जिल्ह्यातील मौजे माखणी तालुका पूर्णा येथील ओंकारेश्वर महिला बचत गटाच्या अध्यक्ष श्रीमती मीरा जनार्धन आवरगंड ,  असोला येथील वसुंधरा महिला गटाच्या अध्यक्ष श्रीमती सुकेषणी चौधरी या दोन महिलांना पुणे पद्मश्री सभागृह आयुक्तालय पुणे येथे संपर्क अधिकारी म्हणून श्रीमती. स्वाती राजेंद्र घोडके तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, परभणी या घेऊन उपस्थित होत्या....

संतोष आळसे - प्रकल्प संचालक आत्मा कृषी अधिक्षक 

            2022 वर्षांमध्ये महीलांचा शेतीमध्ये सहभाग वाढवण्यासाठी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली धोरणनिस्चित करण्यासाठी महीला चर्चा सत्र प्रथम घेण्यात आले त्याचा घरगुती उद्योगासाठी फायदा होणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या