💥ऊसतोड कामगारांच्या संघर्षातून घडलेले आदर्श नेतृत्व म्हणजे गोपिनाथराव मुंडे - माजी आ.आर.टी.देशमुख.


💥स्व गोपिनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम योगेश्वरी शुगर्स लिंबा येथे संपन्न झाला💥

✍️किरण घुंबरे पाटील

पाथरी:-माजी केंद्रियमंत्री स्व गोपिनाथराव मुंडे यांचा जिवन प्रवास मोठा संघर्शशिल राहिला. मराठवाड्या सह राज्याला  हा नेता लाभला तो ऊसतोड कामगारांच्या संघर्षातूनच.अशा संघर्षातूनच माझ्या सारख्या अनेकांना त्यांनी उभे केले.साहेबांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो.मुंडे साहेबांनी दाखवलेल्या मार्गानेच आमचाही प्रवास असणार आहे.असे भाऊक उद्गगार काढत आठवनिंना ऊजाळादेत स्व गोपिनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम योगेश्वरी शुगर्स लिंबा येथे संपन्न झाला त्या वेळी या साखर कारखाण्याचे चेअरमन तथा माजलगावचे माजी आ आर टी देशमुख उर्फ जिजा यांनी बोलतांना व्यक्त केले.


या कार्यक्रमा साठी कार्यकारी संचालक अॅड रोहित आर देशमुख,संचालक डॉ अभिजित देशमुख,प्रमोटर लक्ष्मीकांतराव घोडे,सुदामराव सपाटे,गंगाधरराव गायकवाड तसेच माजलगाव तालुक्यातील नरहरी बडे,सभापती दामोदर बडे,दिलिप बडे,विष्णू बडे,पी  जी सोळंके आदिंची उपस्थिती होती. आठवणीतील मुंडे साहेब या वर पुढे बोलतांना देशमुख म्हणाले की,मुंडे साहेब दीनदुबळ्यांचे कैवारी होते.संघर्षातू ज्यांचा जिवन प्रवास झाला अशा महान नेत्याची जयंती सतत साजरी करत राहाणार असल्याचे ते म्हणाले. स्व मुंडे साहेबांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरी होत असते.


स्व.गोपिनाथ मुंडे साहेबांचं मजुरांवर अतीप्रेम होतं त्यामुळेच ऊस तोड मुदाम,तोडणी मजूर  यांना मिष्ठांन्न भोजन देत नियोजनबद्ध कार्यक्रम संप्पन्न झाला.मिष्ठान्न भोजनाचा जवळपास दोनहजार कामगार,मजूर यांनी लाभ घेतला.या साठी वर्क मॅनेजर अनंत बावने,चिफ केमिस्ट पाराजी हेडे,मुख्यशेतकी अधिकारी देविदास मोकाशे, मुख्यलेखापाल मुकेश रोडगे,कार्यालयीन व्यवस्थापक राजकुमारसिंह तौर,स्टोअर किपर सोमनाथ सावंत,फायनान्स अकांऊंटट माणिकराव डोंबे,केनयार्ड सुपरवाझर पांडूरंग जाधव,वसुली इंनचार्ज संजय महाजन,रोखपाल सुरेश गिराम इत्यादी अधिकारी कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले या कार्यक्रमाचे सत्रसंचालन आणि आभार विष्णू पौळ यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या