💥पुर्णा येथील सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी ज्येष्ठ धम्म उपासक नारायण कोंडीबा ढगे यांचे निधन....!


💥त्यांच्या जलदान विधी कार्यक्रमाचे दि. 29 डिसेंबर रोजी त्यांचे राहते घरी सिद्धार्थ नगर येथे आयोजन💥 

पूर्णा (दि.28 डिसेंबर) येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व जेष्ठ धम्म उपासक नारायण कोंडीबा ढगे यांचे वयाच्या 74 व्या वर्षी ब्रेन स्ट्रोक मुळे दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 06-00 वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.

एक कर्तव्यदक्ष रेल्वे कर्मचारी म्हणून त्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी धम्म कार्यास वाहून घेतले होते धम्म विचाराचा समृद्ध वारसा त्यांना आपले वडील कोंडीबा ढगे त्याचप्रमाणे ज्येष्ठ बंधू माधवराव ढगे जीवनराव ढगे केशवराव ढगे व कनिष्ठ बंधू भारतीय सैन्यामध्ये असलेले टोपाजी ढगे यांच्याकडून मिळाला होता.

संपूर्ण ढगे परिवाराने आपला नोकरी-व्यवसाय सांभाळून आंबेडकरी व धम चवळीची सेवा केली त्यांच्या पश्चात सुपुत्र महेंद्र व कन्या विशाखाताई व माया सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. भारत मुक्ती मोर्चा चे युवा कार्यकर्ते प्रमोद ढगे व प्राध्यापक प्रकाश ढगे यांचे ते काका होते दि. 26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11-00 वाजता बौद्ध स्मशान भूमी मध्ये भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यविधी पार पडला यावेळी सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व मोठ्या संख्येने आप्तेष्ट नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या जलदान विधी कार्यक्रम दिनांक 29 डिसेंबर दुपारी दोन वाजता  त्यांचे राहते घर सिद्धार्थ नगर या ठिकाणी आयोजित केला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या