💥पाथरी तालुक्याातील पेठ बाभळगाव येथे हनुमान मंदिर कलशारोहना निमित्त कुस्ती दंगल संपन्न...!


💥राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावणारे पैलवान राहुल आवारे यांचे पिताश्री बालासाहेब आवारे यांची आवर्जून उपस्थिती💥


किरण घुंबरे पाटील

पाथरी:-तालुक्याातील पेठ बाभळगाव येथील श्री हनुमान मंदिर कलशारोहण कार्यक्रमानिमित्त पेठ येथे खा संजय उर्फ बंडू जाधव माजलगावचे माजी आमदार तथा योगेश्वरी शुगर्सचे चेअरमन आर टी देशमुख जिजा आणि मान्यवरांच्या उपस्थितित गुरूवार ३० डिसेंबर रोजी कुस्त्यांची दंगल पार पडली.यात बाभळगाव कानसुर, तारूगव्हाण, डाकू पिंपरी, उमरा, अंधापुरी, गोंडगाव, गुंज, लोणी बु., मसला पंचक्रोशीतील भव्य कुस्ती सामन्यांचे उद्घाटन जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय जाधव साहेबांच्या हस्ते पार पडले. तर माजलगावचे माजी आ. आर.टी. (जिजा) देशमुख यांच्या हस्ते मैदानात नारळ वाढउन लहान पैलवानांची पहिली कुस्ती लावण्यात आली या वेळी योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक रोहितभैय्या देशमुख, जि.प. सदस्य माणिक घुंबरे, कुंडलिक सोगे, जालना जि.प. सदस्य श्रीहरीराम माने, ह.भ.प. शिवाजी महाराज बाभळगावकर, बीड शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, गजानन माने, युवा सेना तालुका प्रमुख पांडुरंग शिंदे, शिवसेना उपतालुका प्रमुख बालासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावणारा पैलवान राहुल आवारे यांचे पिताश्री बालासाहेब आवारे ते पण आवर्जून उपस्थित होते. या स्पर्धेचे समालोचन धनाजी मुदने पंढरपुर यांनी केले.या स्पर्धेचे आयोजक प्रल्हादराव गिराम, आश्रुबा गीते पैलवान हे होते.या स्पर्धे च्या शस्वितते साठी बाभळगावकर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या