💥मार्गशीष पौर्णिमेनिमित्त बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी धम्मदेसना व सत्कार समारंभ संपन्न...!


💥प्रमुख अतिथी व सत्कार मूर्ती म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितेश कुमार बोलेलू यांची उपस्थिती💥 

पूर्णा (दि.18 डिसेबर) - बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा व धम्मा सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळ यांच्या वतीने भदन्त डॉ उपगुप्त महाथेरो भदंत पया वंश,संघरत्न यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.


प्रमुख अतिथी व सत्कार मूर्ती म्हणून नगर परिषद पूर्णा चे मुख्याधिकारी नितेश कुमार बोलेलू त्याच प्रमाणे पीएचडी परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल प्रा. उषाताई लक्ष्मण मगरे व प्रा अनिता विजय रणवीर यांचा विहार समिती च्यावतीने शाल पुष्पहार व स्मरणिका देउन सत्कार करण्यात आला.

आपल्या प्रमुख धम्मदेशना मध्ये भदंत डॉ.उप गुप्त महाथेरो यांनी समाजातील उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी अधिकारी झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. धम्माचे संस्कार नीतिमान व चरित्र संपन्न समाज घडविण्या मध्ये  महत्त्वपूर्ण योगदान देत असते. भंते पया वंश यांनी मार्गशीष पौर्णिमेचे महत्व विशद केले समाजातील अंधश्रद्धा जुनाट रूढी परंपरा चा त्याग करून विज्ञान वादी बनले पाहिजे असे प्रतिपादन केले.


प्रमुख अतिथी सत्कार मूर्ती पूर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितेश कुमार बोलेलू यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहील . नगर पालिकेच्या  न्याय मागण्या समस्सा प्राधान्यक्रमाने सोडवेल असे अभिवचन त्यांनी दिले पीएचडी प्राप्त केलेल्या उषाताई मगरे व अनिता रणवीर यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी निकोप समाजनिर्मितीसाठी करू असे सांगितले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ रिपाइं नेते प्रकाश कांबळे, नगरपालिकेचे गटनेते उत्तंमभय्या खंदारे नगरसेवक एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड, एडवोकेट धम्मा जोंधळे माजी नगरसेवक अशोक धबाले पत्रकार विजय बगाटे प्राचार्य राम धबा ले ज्येष्ठ धम्म उपासक अमृत मोरे, टी झेड कांबळे, वा.रा. काळे शिवाजी थोरात बाबाराव वाघमारे विजय जोंधळे गौतम वाघमारे साहेबराव सोनवणे मुंजाजी गायकवाड विजय जोंधळे संभाजी गायकवाड बौद्धाचार्य त्रंबक कांबळे, अतुल गवळी किशोर ढाक र गे उमेश बाराटे दिलीप गायकवाड सुनील मगरे भगवान नरवाडे आदींची उपस्थित होती.

या कार्यक्रमात गिरजाबाई अशोक गायकवाड यांनी भिकू संघाला अष्ट परिष्कार चीवर दान उपस्थितांना खीर दान दिले.सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विजय खंडागळे सुरज जोंधळे सोनू काळे भारतीय बौद्ध महासभा व महिला मंडळाच्या दाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या